जगातले सगळ्यात महाग तांदूळ, किंमत वाचूनच व्हाल अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:13 AM2023-03-16T10:13:21+5:302023-03-16T10:13:37+5:30
World's Most Expensive Rice : असा दावा केला जातो की, वाळवंटात पिकणारे हे तांदूळ चवीला फार स्वाटिष्ट आणि भरपूर पोषण असणारे असतात. जगभरातील श्रीमंत लोक हे तांदूळ मोठ्या चवीने खातात.
World's Most Expensive Rice: आतापर्यंत तुम्हाला हेच वाटत असेल की, भारतात निघणारा बासमती तांदूळच सगळ्यात महागडा तांदूळ आहे. पण जगात एक असा देश आहे जिथे तापत्या उन्हात आणि वाळवंट असलेल्या भागात तांदूळ पिकवला जातो. हे तांदूळ अशा देशात पिकवले जातात ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल.
असा दावा केला जातो की, वाळवंटात पिकणारे हे तांदूळ चवीला फार स्वाटिष्ट आणि भरपूर पोषण असणारे असतात. जगभरातील श्रीमंत लोक हे तांदूळ मोठ्या चवीने खातात. या तांदळाचं उत्पादन वाळवंटातील माती आणि तापत्या उन्हात घेतलं जातं.
चला जाणून घेऊ या तांदुळाबाबत. या तांदुळाला हसावी तांदूळ म्हटलं जातं. असं सांगण्यात येतं की, याचं उत्पादन 48 डिग्री सेल्सियसमध्ये घेतलं जातं. तसेच याचं मूळ पूर्णवेळ पाण्यात बुडालेली असतात. याची शेती सौदी अरबमध्ये केली जाते. येथील शेख लोकांना हे तांदूळ फार आवडतात.
असं सांगण्यात येतं की, जर वृद्ध लोकांनी हे तांदूळ खाल्ले तर तरूणांसारखं फीट वाटतं. या शेतीबाबत सांगायचं आठवड्यातील पाच दिवस याला पाणी द्यावं लागतं. भारतात जसं तांदळाचं पीक घेतलं जातं तसंच इथेही घेतलं जातं. पण या तांदुळासाठी जास्त मेहनत लागते.
भीषण गरमीमध्ये लागवड आणि नंतर वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये याची कापणी केली जाते. या तांदळाचा रंग लाल असतो आणि लोक याला रेड राइसही म्हणतात. अरबमध्ये याचा वापर बिरयाणी बनवण्यासाठी केला जातो.
याच्या किंमतीबाबत सांगायचं तर हसावी तांदूळ 50 सौदी रियाल प्रति किलो आहे. भारतीय किंमतीनुसार हा भाव 1000 ते 11000 रूपये किलो दरम्यान झाला. हसावीचा कमी चांगला तांदूळ 800 रूपये किलो विकला जातो.