राणी व्हिक्टोरियाची आवडती दारू, महालाच्या तळघरात सापडल्या सगळ्यात जुन्या 40 बॉटल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:15 AM2023-09-28T10:15:16+5:302023-09-28T10:15:51+5:30
तळघरात दारूच्या 40 बॉटल्स सापडल्या ज्या 90 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. या तेव्हा लपवण्यात आल्या होत्या.
ब्रिटिश राजघराण्याबाबत जेव्हाही काही खुलासे होतात तेव्हा ते समजल्यावर लोक अचंबित होतात. सगळ्यांनाच त्यांच्याबाबत जाणून घ्यायचं असतं. यावेळी शाही महालात सफाई दरम्यान अशी मौल्यवान वस्तू सापडली ज्याची चर्चा जगभरात होत आहे. तळघरात दारूच्या 40 बॉटल्स सापडल्या ज्या 90 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. या तेव्हा लपवण्यात आल्या होत्या. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यांची टेस्ट राणी व्हिक्टोरिया यांनी घेतली होती.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या व्हिस्कीला जगातील सगळ्यात जुनी व्हिस्की असल्याचं सांगितलं जात आहे. हीच व्हिस्की महाराणी व्हिक्टोरिया पित होती. या बॉटल्स ब्लेअर कॅसल, पर्थशायरच्या एका खोलीमध्ये सापडल्या. ट्रस्टी बर्टी ट्रॉटनने यांना या बॉटल्स सफाई दरम्यान सापडल्या.
ज्या शेल्फवर या बॉटल्स ठेवल्या होत्या, त्याच्याखाली यांबाबत माहिती दिली होती. सांगण्यात आलं की, एक बॉटल 1833 मध्ये ठेवली, दुसरी 1841 मध्ये आणि तिसरी 1932 मध्ये ठेवली होती. जेव्हा ही गोष्टी समोर आली तेव्हा समजलं की, ही जगातली सगळ्यात जुनी व्हिस्की आहे. नोव्हेंबरमध्ये यातील 24 बॉटल्सचा ऑनलाइन लिलाव करण्यात येईल. प्रत्येक बॉटलच्या विक्रीतून 10000 पाउंड म्हणजे 10 लाख रूपये मिळण्याचा अंदाज आहे.
व्हिस्कीचा लिलाव करणारे जो विल्सन म्हणाले की, या जुन्या व्हिस्कीची किंमत ठरवणं फार अवघड आहे. या बॉटल्समध्ये दारूचा इतिहास दडला आहे. कदाचित आपण पुन्हा अशी दारू कधीच बघू शकणार नाही. केवळ 24 बॉटल्स विकल्या जातील आणि इतर महालात ठेवल्या जातील. जेणेकरून तिथे येणारे पाहुणे त्या बघू शकतील.