जगाची लोकसंख्या '८ अब्ज' चा आकडा पार करणार! भारताची चिंता वाढणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 02:46 PM2022-11-08T14:46:42+5:302022-11-08T14:49:40+5:30
वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे.
वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी बनवलेल्या अहवालात हे नमुद केले आहे की येणाऱ्या दशकात लोकसंख्येमध्ये होणारी वाढ ही सुरुच राहील. तर २०५० पर्यंत आयुर्मान सरासरी ७७.२ वर्षांपर्यंत वाढेल. एवढेच काय तर १५ नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीवर लोकसंख्या ८ अब्ज एवढी असे. ही लोकसंख्या १९५० सालच्या लोकसंख्येच्या तिप्पट आहे. १९५० साली पृथ्वीवरील लोकसंख्या २.५ अब्ज इतकी होती.
२०२१ मध्ये प्रत्येक स्त्री च्या मागे सरासरी प्रजनन दर २.३ इतका होता. १९५० मध्ये ५ तर २०५० पर्यंत हा दर २.१ च्या खाली येईल अशी शक्यता आहे. सरासरी आयर्मान वाढणे हे लोकसंख्येचे मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्यांनी २०५० पर्यंत सरासरी आयुर्मान ७७.२ वर्षे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. वेगवेगळया देशांमधल्या सरासरी वयात भिन्नता आहे.
चीनची लोकसंख्या कमी तर भारताची चिंता वाढणार?
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अहवालानुसार २०२३ च्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीत भारत पहिल्या क्रमांकावर येईल. तर सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला चीन दुसऱ्या क्रमांकावर जाईल. चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे तर २०५० पर्यंत १.३ अब्ज झालेली असेल. आकडे हेही सांगतात की शतकाच्या शेवटपर्यंत चीनची लोकसंख्या ८० कोटी इतकी खाली येण्याची शक्यता आहे.