मोठा महाल, 8 प्रायव्हेट जेट आणि खूपकाही...हा आहे जगातील सगळ्यात श्रीमंत परिवार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:26 AM2024-01-22T09:26:17+5:302024-01-22T09:27:41+5:30
वर्ल्ड्स रिचेस्ट फॅमिलीज 2023 च्या यादीत पहिल्या स्थानावर होते. शेख मोहम्मद बिन यांच्याबाबत सांगायचं तर ते अबू धाबीचे 17 वे शासक आहेत.
संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या चर्चेचं कारण त्यांची श्रीमंती आहे. त्यांचा परिवार जगातील सगळ्यात श्रीमंत परिवार आहे. ते वर्ल्ड्स रिचेस्ट फॅमिलीज 2023 च्या यादीत पहिल्या स्थानावर होते. शेख मोहम्मद बिन यांच्याबाबत सांगायचं तर ते अबू धाबीचे 17 वे शासक आहेत.
ब्लूमबर्गनुसार, या शाही परिवाराकडे 305 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 25,38,667 कोटी रूपयांची संपत्ती आहे. शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांना MBZ नावानेही ओळखलं जातं. द न्यूयॉर्करनुसार, या परिवाराकडे जगातील जवळपास सहा टक्के तेल भांडार आहे. त्यांनी अनेक बिझनेसमध्ये गुंतवणूक केली आहे. MBZ यांच्याकडे मॅन्चेस्टर सिटी फुटबॉल क्लबचं स्वामित्व आणि ऑटोमोबाइल कंपन्यांची भागीदारी आहे.
GQ वेबसाइटनुसार, या परिवाराकडे सोन्यापासून तयार अल वतन महाल आहे. हा यूएईमधील सगळ्यात मोठ्या महालांपैकी एक आहे. हा महाल 94 एकर परिसरात आहे. MBZ या परिवाराचे मुख्य आहेत. त्यांना 18 भाऊ आणि 11 बहिणी आहेत. त्यांना 9 मुलं आणि 18 नातवंडे आहेत. शासकाच्या लहान भावाकडे 700 कारचं कलेक्शन आहे. या परिवाराकडे दुबईशिवाय पॅरिस आणि लंडनमध्येही संपत्ती आहे.
न्यूयॉर्करने 2015 मध्ये एका रिपोर्टमध्ये सांगितलं की, या परिवाराकडे ब्रिटनच्या शाही परिवारा एवढी संपत्ती आहे. 2008 मध्ये MBZ यांच्या अबू धाबी यूनायटेड ग्रुपने यूके फुटबॉल टीम मॅन्चेस्टर सिटीला 2,122 कोटी रूपयांना खरेदी केलं होतं.