७ हजार लक्झरी कार्स, महालात हिरे, सोन्याचं नक्षीकाम; पाहा कशी आहे सुलतानाची लाईफस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:57 PM2022-01-28T20:57:01+5:302022-01-28T20:57:41+5:30

जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक असलेल्या सुलतानाकडे ७ हजारांपेक्षा अधिक कार्स आहेत. केवळ त्या कार्सचीच किंत ३४१० कोटी रुपये आहे.

worlds richest sultan brunei prime minister hasanal bolkia car collection palace private jet | ७ हजार लक्झरी कार्स, महालात हिरे, सोन्याचं नक्षीकाम; पाहा कशी आहे सुलतानाची लाईफस्टाईल

७ हजार लक्झरी कार्स, महालात हिरे, सोन्याचं नक्षीकाम; पाहा कशी आहे सुलतानाची लाईफस्टाईल

googlenewsNext

जगातील एकापेक्षा एक श्रीमंत लोकांबाबत आपण ऐकलं असेल. असाच एक सुलतान आहे, ज्याच्याकडे जवळपास ७ हजार लक्झरी कार्स आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस (Rolls Royce), मर्सिडीज (Mercedes), फरारी (Ferrari), बेंटले (Bentley) यासह अनेक लक्झरी वाहनांचा समावेश आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की बसण्यासाठीही सोन्याच्या सिंहासनाचा वापर केला जातो. इतकंच नाही, तर त्यांची गाडीदेखील सोन्यानं मढलेली असते. तर मग जाणून घेऊया कोण आहे या ७ हजार कार्सचा मालक.

७ हजार कार्ससह अमाप संपत्तीच्या मालकाचे नाव हसनल बोलकिया (Hassanal Bolkiah) असे आहे. ते ब्रुनईचा (बोर्निओ बेटावरील एक छोटासा देश) विद्यमान सुलतान आणि पंतप्रधान आहेत. जगातील श्रीमंत राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. हसनल बोलकिया यांनी ब्रुनेईवर राज्य केल्यापासून ५० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. १९८० पर्यंत हसनल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.


काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या शासन काळाची ५० वर्षे साजरी केली. यामध्ये हजारो लोक सामील झाले होते. त्यांचं कुटुंब ब्रुनेईवर ६०० वर्षांपासून राज्य करत असल्याचं सांगितलं जातं. जेव्हा हसनल २१ वर्षांचे होते, तेव्हाच १९६७ मध्ये त्यांच्या हाती देशाचा कारभार आला.

कार कलेक्शन आणि प्लेन
अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांच्या कार कलेक्शनमध्ये ७ हजार कार्स आहेत. यामध्ये ६०० पेक्षा अधिक रोल्स रॉयस, ५७० पेक्षा अधिक मर्सिडीज बेंझ आणि अन्य लक्झरी कार्स आहेत. त्यांच्याकडे एक अशीही कार आहे, जी पूर्णपणे सोन्यानं मढवलेली आहे. अनेकगा ती कार रस्त्यांवरही दिसून येते.

 
विमानातही लिविंग रुम, बेडरुम
एका रिपोर्टनुसार हसनल बोलकिया यांच्याकडे लक्झरी सुविधा असलेली प्रायव्हेट जेट बोईंग ७४७-४००, बोईंग ७६७-२०० आणि एअरबस ए३२०-२०० आहे. परंतु त्यांचं एक जेट सोन्यानं सजवलेलं आहे. यामधअये लिविंग रुम, बेडरुमसह अन्य सुविधाही आहेत. रिपोर्टनुसार त्यांच्याकडे १४ हजार ७०० कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे. कच्चा तेलाचा साठा आणि नैसर्गिक गॅस हे त्यांच्या कमाईचं प्रमुख साधन आहे. त्यांच्या पॅलेसलाही त्यांनी 'इस्ताना नुरुल इमान पॅलेस' असं नाव दिलं आहे. याची किंमत २२५० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.

त्यांचा हा पॅलेस १९८४ मध्ये तयार करण्यात आला असून तो २ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये २२ कॅरेट सोन्याचाही वापर करण्यात आला आहे. यात १७०० पेक्षा अधिक खोल्या, २५७ बाथरुम, पाच स्विमिंग पूल, ११० गॅरेज आणि २०० घोड्यांसाठी एसी जागाही आहे.

Web Title: worlds richest sultan brunei prime minister hasanal bolkia car collection palace private jet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.