जगातील सर्वांत लहान हत्तीचा मृत्यू
By admin | Published: January 9, 2017 01:31 AM2017-01-09T01:31:39+5:302017-01-09T01:31:39+5:30
जगातील प्रमुख बेटांपैकी एक असलेल्या बोर्नियो बेटावर जगातील सर्वात लहान हत्तीचा मृत्यू झाला आहे.
बोर्नियो : जगातील प्रमुख बेटांपैकी एक असलेल्या बोर्नियो बेटावर जगातील सर्वात लहान हत्तीचा मृत्यू झाला आहे. हस्तीदंतासाठी शिकार करणाऱ्यांनीच या हत्तीला मारले. वन्यजीव मित्रांनी म्हटले आहे की, आम्ही अतिशय दु:खात आहोत. हे दु:ख शब्दात आम्ही व्यक्त करु शकत नाही. हत्तीचा सांगाडा सापडल्यानंतर एकाच दिवसात चीनने असे म्हटले आहे की, २०१७ च्या अखेरीस हस्तीदंताच्या व्यापारावर बंदी आणण्यात येईल. आफ्रिकी हत्तींचे संकट एकीकडे वाढत असताना या हत्तीचा मृत्यू झाला आहे. वन्यजीव संरक्षण सोसायटीचे उपाध्यक्ष एलिझाबेथ बेनेट यांनी म्हटले आहे की, हस्तीदंताचा बाजार आधी आम्हाला बंद करावा लागेल तेंव्हाच हत्तींच्या मृत्यूला आळा घालता येणे शक्य आहे.