कमाल! 'या' गावातील सगळे लोक राहतात जमिनीखाली, घरं बघाल तर व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:27 PM2023-02-07T15:27:21+5:302023-02-07T16:38:55+5:30
Worlds strangest town : या गावाची खासियत ही आहे की, या गावातील जवळपास सगळेच अंडरग्राउंड राहतात. बाहेरून दिसायला भलेही ही घरे सामान्य वाटत असतील पण आतून आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाहीत.
Worlds strangest town : जगभरात अशी वेगवेगळी कितीतरी ठिकाणे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखली जातात. असंच एक वेगळं ठिकाण दक्षिण ऑस्ट्रेलियात आहे. येथील एक अख्ख गाव जमिनीखाली राहतं. या अनोख्या गावाचं नाव कूबर पेडी असं आहे. या गावाची खासियत ही आहे की, या गावातील जवळपास सगळेच अंडरग्राउंड राहतात. बाहेरून दिसायला भलेही ही घरे सामान्य वाटत असतील पण आतून आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाहीत.
या परिसरात ओपलच्या(एकप्रकारचं रंगीत किंमती दगड) अनेक खाणी आहेत. लोक याच ओपलच्या रिकाम्या खाणींमध्ये राहतात. कूबर पेडी हे ठिकाण ओपलची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. कारण इथे जगातली सर्वात जास्त ओपल खाणी आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कूबर पेडीमध्ये मायनिंगचं काम १९१५ पासून सुरू होतं. हा एक वाळवंटाचा परिसर असून इथे उन्हाळ्यात फार जास्त तापमान असतं आणि हिवाळ्यात तापमान कमी असतं. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून लोकांनी मायनिंगच्या रिकाम्या खाणींमध्ये राहण्यास सुरूवात केली.
कूबर पेडीतील या अंडरग्राऊंट घरांमध्ये उन्हाळ्यात ना एसीची गरज पडत ना हिवाळ्यात हिटरची गरज पडत. सध्या इथे १५०० पेक्षा अशी अंडरग्राऊंड घरे आहेत.
जमिनीखाली असलेल्या या घरांमध्ये सर्वच सोयी-सुविधा आहेत. तसेच इथे अनेक हॉलिवूड सिनेमांचं शूटिंगही झालं आहे. २००० मध्ये आलेल्या 'पिच ब्लॅक' सिनेमाच्या शूटिंगनंतर प्रॉडक्शन हाऊसने सिनेमात वापरलेली स्पेसशिप इथेच ठेवली होती. ही स्पेसशिप आता पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.