उलट्या ‘यू’ आकाराची जगातील सर्वांत उंच इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 01:37 AM2017-03-28T01:37:21+5:302017-03-28T01:37:21+5:30

गगनचुंबी इमारती उभारण्याची चढाओढ वाढतच आहे. आता न्यूयॉर्कच्या ओइयो स्टुडिओ या कंपनीने उलट्या

The world's tallest building in the void U 'shape | उलट्या ‘यू’ आकाराची जगातील सर्वांत उंच इमारत

उलट्या ‘यू’ आकाराची जगातील सर्वांत उंच इमारत

googlenewsNext

न्यूयॉर्क : गगनचुंबी इमारती उभारण्याची चढाओढ वाढतच आहे. आता न्यूयॉर्कच्या ओइयो स्टुडिओ या कंपनीने उलट्या ‘यू’ आकाराची इमारत उभारण्याची तयारी सुरू केली असून, ही इमारत जगात सर्वात उंच असेल, असा या कंपनीचा दावा आहे. या इमारतीची उंची चार हजार फूटांहून अधिक राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या इमारतीचे नाव ‘द बिग बेंड’ असेल. ‘सेंट्रल पार्कच्या जवळ ‘बिलिनेयर रो’ येथे ती उभी राहणार असून, शहरातील अनेक शाही इमारती याच ठिकाणी आहेत. वन ५७ टॉवर (शहरातील आठवी सर्वात उंच इमारत) आणि लवकरच तयार होणाऱ्या बिल्डिंग १११ वेस्ट या इमारतींच्या मध्ये ही इमारत असेल. काचेच्या या इमारतीतील लिफ्टचे काम सर्वात आव्हानात्मक असेल. कारण ही लिफ्ट ‘यू’ आकारात चालणार आहे. तयार झाल्यास ही इमारत बुर्ज खलिफा, न्यूयॉर्कच्या वन वर्ल्ड ट्रेड सेंटरसह जगातील इतर सर्व उंच इमारतींच्या दुप्पट असेल.

Web Title: The world's tallest building in the void U 'shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.