जगातील सगळ्यात तरूण अब्जाधीश, संपत्ती इतकी की आकडा वाचून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 11:10 AM2023-12-04T11:10:21+5:302023-12-04T11:15:57+5:30
Worlds youngest billionaires : कॉलेज जाण्याच्या वयातच इतकी संपत्ती मिळवली की, जी एखाद्या सामान्य व्यक्तीला 7 जन्मातही कमवता येणार नाही.
Worlds youngest billionaires : जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांमध्ये एलन मस्क, जेफ बेजोस, बर्नार्ड अर्नाल्ट, बिल गेट्स आणि मार्क जुकरबर्ग यांचा समावेश होतो. पण कमी वयातच अब्जाधीश झालेल्या तरूणाबाबत तुम्हाला माहीत नसेल. त्याने कॉलेज जाण्याच्या वयातच इतकी संपत्ती मिळवली की, जी एखाद्या सामान्य व्यक्तीला 7 जन्मातही कमवता येणार नाही.
इंटरनॅशनल मॅगझीन फोर्ब्सने अब्जाधीशांची लिस्ट जाहीर केली होती. ज्यात 19 वर्षाच्या एका तरूणाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. 19 वर्षीय क्लेमेंटे डेल वेक्चिओची एकूण संपत्ती 4 बिलियन डॉलर आहे म्हणजे 33 हजार कोटी रूपयांपेक्षाही जास्त. चला जाणून घेऊ तो करतो तरी काय?
कशी मिळाली इतकी संपत्ती?
क्लेमेंटे डेल वेक्चिओला ही ओळख परिवाराकडून मिळालेल्या बिझनेसमधून मिळाली. त्याचे वडील इतालवी लियोनार्डो डेल वेक्चिओ, जगातील सगळ्यात मोठी आयविअर कंपनी एस्सिलोरलक्सोटिकाचे माजी चेअरमन होते. गेल्यावर्षी वयाच्या 87 व्या वर्षी त्याचं निधन झालं. यानंतर मृत्युपत्राच्या आधारावर त्यांची पत्नी आणि 6 मुलांमध्ये त्यांची 25.5 बिलियन डॉलरची संपत्ती वाटण्यात आली. यानंतर क्लेमेंटेच्या हिश्श्यावर जी रक्कम आली त्यातून 2022 मध्ये इतिहासातील सगळ्यात कमी वयाचा अब्जाधीश बनला.
क्लेमेंटे डेल वेक्चिओ जेव्हा 18 वर्षाचा होता तेव्हा त्याला लक्ज़मबर्ग येथील होल्डिंग कंपनी डेल्फ़िनमध्ये 12.5 टक्के भागीदारी मिळाली. ज्याचे मालक त्याचे वडील होते.
इतकी संपत्ती मिळाल्यानंतरही क्लेमेंटे डेल वेक्चिओने आपलं शिक्षण सोडं नाही. डीएनएच्या रिपोर्टनुसार, क्लेमेंटे डेल वेक्चिओकडे इटलीमध्ये अनेक शानदार संपत्ती आहे. यात मिलानमध्ये एक अपार्टमेंट आणि लेक कोमोजवळ एक व्हिलासहीत इतर प्रॉपर्टीजचा समावेश आहे. क्लेमेंटेचा भाऊ 22 वर्षीय लुका डेल वेक्चिओची नेटवर्थ 4 बिलियन डॉलर आहे. तेच त्याची बहीण लियोनार्डो मारिया डेल वेक्चिओ, तरूण अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये 7 व्या स्थानावर आहे.