केवळ एका मुलाला शिकवण्यासाठी कोट्यवधीची शाळा, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 02:41 PM2019-02-27T14:41:12+5:302019-02-27T14:52:09+5:30

सरकार याबाबत किती सजग असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण अमेरिकेतील व्योमिंग येथील लारामी शहरात बघायला मिळालं.

Wyoming district laramie opens again one student school | केवळ एका मुलाला शिकवण्यासाठी कोट्यवधीची शाळा, कारण वाचून व्हाल थक्क!

केवळ एका मुलाला शिकवण्यासाठी कोट्यवधीची शाळा, कारण वाचून व्हाल थक्क!

googlenewsNext

(Image Credit : Blackhills Fox KEVN)

आजकाल लिहिणं-वाचणं लहान मुलांसाठी किती महत्त्वपर्ण आहे. आणि सरकार याबाबत किती सजग असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण अमेरिकेतील व्योमिंग येथील लारामी शहरात बघायला मिळालं. इथे सरकार केवळ एका मुलाला शिकवण्यासाठी एक कोटी रूपये खर्च एका शाळेची सुरूवात करणार आहे. 

हे पहिलं प्रकरण नाही की, लारामी शहरात केवळ एका विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू करण्यात आली. १५ वर्षांआधी म्हणजेच २००४ मध्ये सुद्धा एका मुलासाठी शाळा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, ही शाळा विद्यार्थी आणि मुलांसाठी फार अनोखी आहे. कारण इथे त्यांना त्रास द्यायला कुणीही येत नाही. 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

लारामीमध्ये केवळ एका मुलाला शिकवण्यासाठी शाळा सुरू करण्यामागचं कारण म्हणजे या परिसराचा जास्तीत जास्त भाग हा डोंगराळ आहे. त्यासोबतच व्योमिंगच्या कायद्यानुसार, रहिवाशी परिसरात दूर राहणाऱ्या मुलांना जास्त लांब असलेल्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात नाही. 

डोंगराळ भाग असल्या कारणाने लारामीमध्ये रस्त्यांची स्थिती फारच वाईट आहे आणि त्यामुळे येथील मुलांना घेऊन येणे किंवा दूर शाळेत घेऊन जाणे फार कठीण आणि अडचणीचे आहे. सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला होता. पण शिक्षकाच्या गैरहजेरीत विद्यार्थ्यांना शिकवणे फार कठीण आहे. 

या परिसरात एका शाळा फार पूर्वीपासून आहे. या शाळेचं नाव कोजी हॉलो एलिमेंट्री स्कूल असं आहे. ही शाळा काही वर्षांपूर्वी २४० विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार तयार करण्यात आली होती. पण २००४ पासून ही शाळा पूर्णपणे बंद आहे. 

Web Title: Wyoming district laramie opens again one student school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.