2023 मध्ये भारतीयांनी Swiggy वरून किती कंडोम खरेदी केले? इतर वस्तूंचाही आहे रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:13 PM2023-12-21T14:13:41+5:302023-12-21T14:14:29+5:30
Year End 2023 : यात सांगण्यात आलं की, लोकांनी सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात दाखवला. ते म्हणाले रेकॉर्ड टाइममध्ये लोकांच्या घरी कंडोमसहीत अनेक गोष्टी पोहोचवण्यात आल्या.
Year End 2023 : 2023 हे वर्ष आता संपत आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर 2023 मधील अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. अशात स्विगीने त्यांचे 'स्विगी इंस्टामार्ट क्विक कॉमर्स ट्रेंड्स 2023' जारी केले आहेत. त्यांनी सांगितलं की, यावर्षी भारतीयांनी स्विगी इंन्टामार्टवरून सगळ्यात जास्त काय मागवलं. यात सांगण्यात आलं की, लोकांनी सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात दाखवला. ते म्हणाले रेकॉर्ड टाइममध्ये लोकांच्या घरी कंडोमसहीत अनेक गोष्टी पोहोचवण्यात आल्या.
स्विगी 15 ते 20 मिनिटात शहरातील लोकांना गोष्टी डिलिवर करतात. चला तर जाणून स्विगी इंस्टामार्टचा 2023 चा रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चेन्नईच्या एका व्यक्ती 31, 748 रूपयांची सगळ्यात मोठी ऑर्डर दिली होती. त्याने कॉफी, ज्यूस, कुकीज, नाचोस आणि चिप्स मागवले होते.
नंतर जयपूरच्या एका व्यक्तीने एकाच दिवसात 67 ऑर्डरचा रेकॉर्ड बनवला होता. तेच दिल्लीतील एका दुकानदाराने आपल्या वार्षिक किराणा खर्च 12,87,920 रूपयांवर 1,70,102 रूपयांची बचत केली. तेच सप्टेंबर महिन्याची तुलना व्हॅलेंटाईन मंथसोबत केली गेली. कारण फेब्रुवारी नाहीतर सप्टेंबरमध्ये सगळ्यात जास्त कंडोम विकले गेले.
12 ऑगस्टला सगळ्यात जास्त 5893 कंडोमची विक्री झाली. त्याशिवाय कांदे, केळी, चिप्स, पेंटिंगच्याही बऱ्याच ऑर्डर आल्या. लोक या वर्षात आपल्या आरोग्याबाबत फार जागरूक दिसले.
मखान्याचे 1.3 मिलियनपेक्षा जास्त ऑर्डर आले. यावरून हे समजतं की, लोकांनी मखाने आवडीचं म्हणून खरेदी केलं. फळांमध्ये आंब्याचा दबदबा राहिला, खारकरून बंगळुरूने, मुंबई आणि हैदराबाद यांनाही मागे सोडलं. एकट्या 21 मे रोजी देशभरात 36 टन आंब्यांची डिलीवरी झाली आहे.