Year Ender 2023: हे होते या वर्षातील सगळ्यात कमजोर पासवर्ड, हॅकर्सने सहज केले क्रॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:30 AM2023-12-08T11:30:38+5:302023-12-08T11:31:47+5:30

हे पासवर्ड संख्या आणि अल्फाबेटने बनवले होते. यात कोणते स्पेशल कॅरेक्टरही नव्हते. फारच सामान्य असल्याने ते सहजपणे क्रॅक केले गेले.

Year Ender 2023: These were the weakest passwords of the year, easily cracked by hackers | Year Ender 2023: हे होते या वर्षातील सगळ्यात कमजोर पासवर्ड, हॅकर्सने सहज केले क्रॅक

Year Ender 2023: हे होते या वर्षातील सगळ्यात कमजोर पासवर्ड, हॅकर्सने सहज केले क्रॅक

Worst Passwords of 2023: 2023 वर्षातील हा शेवटचा महिना सुरू आहे. काही दिवसांनी आपण 2024 या नव्या वर्षात प्रवेश करू. अशात सरत्या वर्षात काय काय झालं याची माहिती समोर येत असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही पासवर्डबाबत जे क्रॅक करण्यासाठी हॅकर्सना जराही वेळ लागला नाही. हे पासवर्ड संख्या आणि अल्फाबेटने बनवले होते. यात कोणते स्पेशल कॅरेक्टरही नव्हते. फारच सामान्य असल्याने ते सहजपणे क्रॅक केले गेले.

बरेच लोक सोशल मीडिया अकाऊंट सेफ ठेवण्यासाठी ‘स्ट्रॉन्ग पासवर्ड’ ठेवतात. अशात जास्तीत जास्त लोक पासवर्डमध्ये देशाचं नाव ठेवतात. रिपोर्टनुसार, भारतात जास्तीत जास्त इंटरनेट यूजर आपला पासवर्ड India@123 ठेवतात. असे पासवर्ड ठेवणाऱ्यांची संख्या देशातच नाही तर इतर देशांमध्येही खूप आहे.

रिपोर्टमध्ये असं आढळून आलं की, यावर्षी 'अॅडमिन' शब्दाचा वापर भारतासहीत जगातील अनेक देशात सगळ्यात कॉमन पासवर्डपैकी एक होता. तर गेल्यावर्षी ‘पासवर्ड’ हा शब्द आपला पासवर्ड ठेवला होता. भारतात यावर्षीही जास्त यूजरने Pass@123 किंवा Password@123 चा वापर केला.

रिपोर्टनुसार, यावर्षी जगातील साधारण एक तृतियांश सगळ्यात लोकप्रिय पासवर्ड हे संख्यापासून बनले आहेत. यात ‘123456789’, ‘12345’, ‘000000’ सगळ्यात कॉमन पासवर्ड होते. यादरम्यान जगभरातील 70 टक्के पासवर्ड 1 सेकंदापेक्षा कमी वेळेत क्रॅक करण्यात आले.

शोधकर्त्यानी इंटरनेट यूजरकडून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी वापरल्या जाणाऱ्या पासवर्डबाबत माहिती मिळवण्यासाठी चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या मेलवेअर द्वारे जाहीर करण्यात आलेल्या पासवर्डच्या 6.6 टीबी डेटाबेसचं विश्लेषण केलं.
 

Web Title: Year Ender 2023: These were the weakest passwords of the year, easily cracked by hackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.