रेल्वे प्लॅटफॉर्मवर का बनवली जाते पिवळ्या रंगाची पट्टी? कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 09:56 AM2022-12-13T09:56:32+5:302022-12-13T09:56:51+5:30

Railway Station Platform: तुम्ही ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जात असाल तर काही गोष्टी नोटीस केल्या असतील. पण त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला नसेल.

Yellow line on railway platform why know this reason | रेल्वे प्लॅटफॉर्मवर का बनवली जाते पिवळ्या रंगाची पट्टी? कारण वाचून व्हाल अवाक्...

रेल्वे प्लॅटफॉर्मवर का बनवली जाते पिवळ्या रंगाची पट्टी? कारण वाचून व्हाल अवाक्...

Next

Railway Station Platform: भारतीय रेल्वे जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वेच्या जाळ्यांपैकी एक आहे. लांबलचक प्रवास असो वा एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल तर ही लाइफलाईन रेल्वे लोकांचा प्रवास सोपा आणि आनंदी करते. रोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. लोकांची सुविधा ध्यानात ठेवून रेल्वेत अनेक बदलही केले गेले आहेत. तुम्ही ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जात असाल तर काही गोष्टी नोटीस केल्या असतील. पण त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला नसेल.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, रेल्वे स्टेशन लहान असो की मोठं रेल्वे प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यावर पिवळ्या रंगाची पट्टी बनलेली असते. ही पिवळी पट्टी रेल्वे लाइनच्या समांतर बनलेली असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, ही पिवळ्या रंगाची पट्टी का तयार केलेली असते? काही प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाच्या टाइल्स लावूनही पिवळी लाईन बनवली जाते. चला जाणून घेऊ ही पिवळी लाईन तयार करण्याचा अर्थ...

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळी पट्टी बनवण्याचं कारण प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचते तेव्हा लोक रेल्वेत चढण्यासाठी एकदम रेल्वे रूळाच्या जवळ येतात. पण पिवळी तुम्हाला याची आठवण करून देते की, तुम्हाला पिवळ्या लाईनच्या मागे रहायचं आहे. पिवळ्या पट्टीच्या मागे राहिल्यावर तुम्ही कोणत्याही दुर्घटनेतून वाचू शकता. जेव्हा रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हवेचा दबाव प्रवाशांना रेल्वेकडे खेचतो. पण जर लोक पिवळ्या लाईनच्या मागे राहिले तर हवेचा दबाव कमी होतो. त्याशिवाय प्लॅटफॉर्मववर बनलेली ही जाड पिवळी लाईन यासाठी असते की, हृष्टी नसलेल्या लोकांना योग्य मार्ग दिसावा. 

Web Title: Yellow line on railway platform why know this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.