फक्त युट्युब चॅनल सुरु केलं अन् काहीच वर्षात झाला कोट्यावधींचा मालक, कसा? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 08:48 PM2021-12-31T20:48:37+5:302021-12-31T20:54:35+5:30

आपल्या आवडीच्या विषयातलं चॅनेल त्याने सुरू केलं आणि त्याच्यावर नियमितपणे पोस्ट टाकायला प्रारंभ केला. बघता बघता त्याला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला आणि एक वर्षात कमालच झाली.

yotuber grahem stephan becomes millionaire | फक्त युट्युब चॅनल सुरु केलं अन् काहीच वर्षात झाला कोट्यावधींचा मालक, कसा? घ्या जाणून

फक्त युट्युब चॅनल सुरु केलं अन् काहीच वर्षात झाला कोट्यावधींचा मालक, कसा? घ्या जाणून

Next

अमेरिकेतील (America) ग्राहम स्टीफन नावाच्या तरुणाचं (Graham Stephan) नशीब एका वर्षात पूर्णपणे पालटून गेलं. याला काऱणीभूत ठरला त्याचा एक मोठा निर्णय. हा निर्णय़ होता स्वतःचं यूट्यूब चॅनेल (YouTube Channel) सुरू करण्याचा. आपल्या आवडीच्या विषयातलं चॅनेल त्याने सुरू केलं आणि त्याच्यावर नियमितपणे पोस्ट टाकायला प्रारंभ केला. बघता बघता त्याला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला आणि एक वर्षात कमालच झाली.

या तरुणाचं नाव आहे ग्राहम स्टीफन. वयाच्या केवळ तेराव्या वर्षी त्याने अक्वॅरियम सेलर म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. पुढची तीन वर्षं तिथं काम केलं आणि मग एक रॉक बँड ड्रमर म्हणून तो काम करू लागला आणि २००८ मध्ये त्याने एक रिअल इस्टेट एजंट म्हणून कामाला सुुरुवात केली.

वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या ग्राहमनं २००१६ साली एक यूट्यूब चॅनेल सुरू केलं. या चॅनेलवर तो पर्सनल फायनान्स, रिअल इस्टेट आणि गुंतवणूक यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट करत होता. त्यामुळे त्याचं नशीब बदलायला सुरुवात झाली. २०१७ साली तो इतर जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाला आणि पूर्णवेळ यूट्यूबर म्हणून काम करणं सुरू केलं. त्याच वर्षी त्याने यूट्यूबमधून तब्बल १९ लाख रुपयांची कमाई केली.

चालवतो दोन चॅनेल
ग्राहमचे सध्या दोन यूट्यूब चॅनेल आहेत. त्या दोन्ही चॅनेलमधून त्याची घसघशीत कमाई होते. त्याच्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत.

  • YouTube जाहीराती
  • ऑनलाईन कोर्सेस
  • रियल इस्टेट एजंट
  • स्पॉन्सर्स
  • अमेझॉनच्या सहकारी संस्थांकडून कमाई
  • कंपन्यांचा सल्लागार म्हणून काम करण्याची कमाई

सध्या यूट्यूबवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने आपली सर्व कामं बाजूला ठेवली आहेत. या क्षेत्रात एक उत्तम करिअर घडू शकतं, याची प्रचिती ग्राहमच्या प्रवासातून येते.

Web Title: yotuber grahem stephan becomes millionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.