फक्त 70 रूपयांमध्ये खरेदी करा इटलीमध्ये घर; मात्र एकच अट!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 02:29 PM2018-09-21T14:29:10+5:302018-09-21T14:32:33+5:30
इटली जगभरातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक समजलं जातं. अनेक लोकांच्या ड्रिम डेस्टिनेशनच्या लिस्टमध्ये इटलीचा समावेश असतोच. निसर्ग सौंदर्याने नटलेलं, उत्तम खाद्यपदार्थांचा खजाना आणि मन प्रसन्न करणारं वातावरण असलेलं शहर म्हणजे इटली.
इटली जगभरातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक समजलं जातं. अनेक लोकांच्या ड्रिम डेस्टिनेशनच्या लिस्टमध्ये इटलीचा समावेश असतोच. निसर्ग सौंदर्याने नटलेलं, उत्तम खाद्यपदार्थांचा खजाना आणि मन प्रसन्न करणारं वातावरण असलेलं शहर म्हणजे इटली. अशा शहरात घर खरेदी करण्याचं स्वप्न पडल्यशिवाय राहणारचं नाही. पण हे स्वप्न सत्यात उतरणं तसं पाहायला गेलं तर अवघड आहे. त्यासाठी अचानक काही चमत्कार झाला तरच ते शक्य आहे हे आपण सारेच जाणतो. पण जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, फक्त एका डॉलरमध्ये म्हणजेच जवळपास 70 रूपयांमध्ये तुम्ही इटलीमध्ये घर खरेदी करू शकता. धक्का बसला ना ऐकून? होय... तुम्ही फक्त 70 रूपयांमध्ये इटलीमध्ये घर खरेदी करू शकता.
'कॉस्मोपॉलिटन'च्या वृत्तानुसार, इटली शहराच्या ओलोलिमध्ये शेकडो घर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याबाबत सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे रियल इस्टेट बाजारामध्ये यांची किंमत फक्त 1 यूरो इतकीच आहे. पुन्हा धक्का बसला असेल ना?
ओलोलिमध्ये घरांच्या अशा धक्का देणाऱ्या किमतींच्या मागे एक कारण आहे आणि थोडंसं गणितही. ओलोलिची लोकसंख्या फक्त 1300 इतकीच आहे. हे जगातील सर्वात लहान शहरांपैकी एक आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 50 वर्षांपूर्वी या शहराची लोकसंख्या 2250 इतकी होती. म्हणजेच वळेनुसार लोकसंख्या घटत चालली आहे. वेळेनुसार शहर नष्ट होणार तर नाही ना? अशी भीती येथील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
इटलीमध्ये घर खरेदी करून आपल्या कुटुंबासोबत स्थायिक होण्यासाठी लोकांना येथील सरकारकडून विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे या घरांची किंमत फक्त 1 यूरो ठेवण्यात आली आहे. पण यासाठी एक अटही ठेवण्यात आली आहे.
अट अशी आहे की, घर खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या घराचं नुतनीकरण करावं लागणार आहे. यामागे एक गणित आहे. तुम्ही घराचं नुतनीकरण करायला घेतलं की, त्यासाठी तुम्हाला 25000 डॉलरपरंयत खर्च होणार आहे. म्हणजेच आजच्या तारखेमध्ये 17 लाख 95 हजार 375 रूपये.