... म्हणून हॉटेलमध्ये जेवणानंतर फिंगर बाउल येतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 01:03 PM2018-07-28T13:03:22+5:302018-07-28T13:03:33+5:30
आपण जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जातो. त्यावेळी जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी एका भांड्यामध्ये लिंबाची फोड आणि कोमट पाणी दिले जाते. ज्याला फिंगर बाउल म्हटलं जातं.
आपण जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जातो. त्यावेळी जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी एका भांड्यामध्ये लिंबाची फोड आणि कोमट पाणी दिले जाते. ज्याला फिंगर बाउल म्हटलं जातं. पण तुम्ही विचार केलाय का? हात धुण्यासाठी बसल्या जागेवर फिंगर बाउल का देण्यात येतो? जाणून घेऊयात फिंगर बाउलची कहाणी आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याबाबत...
फिंगर बाउल देण्यामागे एक खास गोष्ट आहे. जुन्या काळात जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कपड्यांना डाग लागू नये यासाठी फिंगर बाउल देण्यात येत असे. परंतू, सध्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये गोड खाण्याच्या आधीच फिंगर बाउल देण्यात येतो.
लिंबू असलेलाच फिंगर बाउल का देण्यात येतो?
अनेकांना प्रश्न पडत असेल की, फिंगर बाउलमध्ये लिंबूच का टाकतात?अशी कोणतीही परंपरा नाही. फिंगर बाउलमध्ये लिंबू टाकण्यात येतो याचं कारण म्हणजे लिंबामध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे कोमट पाण्यात लिंबू टाकल्याने हाताला लागलेला खाण्याचा गंध आणि तेल नाहीसं होतं आणि त्याव्यतिरिक्त असलेले हातावरील बॅक्टेरियाही नाहीसे होतात.
शिष्टाचारांनुसार...
पर्सनॅलिटी ग्रूमिंग तज्ञांचे असे मत आहे की, जेवणाच्या शिष्टाचारांनुसार, फिंगर बाउलमध्ये आपला पूर्ण हात बुडवण्यापेक्षा फक्त बोटं बुडवावीत. अनेकदा लोकं फिंगर बाउलमध्ये हात टाकून लिंबू पिळून काढतात. जे डायनिंग एथिकेट्सनुसार योग्य नाही.
फिंगर बाउलची पद्धत कशी रूढ झाली?
फिंगर बाउलची पद्धत ही अत्यंत जुनी आहे. जुन्या काळात रेस्टॉरंटचे मालक फिंगर बाउल आणि लाइव म्यूजिकच्या उपयोगाने उच्चभ्रू लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असत. तसेच आपल्या देशात अनेक ठिकाणी जेवणानंतर फिंगर बाउल देणं परंपरा मानली जाते. तेच अमेरिकेमध्ये ही पद्धत पहिल्या महायुद्धाच्यावेळीच संपली होती. अमेरिका खाद्य प्रशासनाने अतिरिक्त चांदी, बोन चाइना आणि काचेच्या गोष्टींपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते.
आपल्याकडे असलेली पद्धत
भारतीय संस्कृतीनुसार, भांड्यामध्ये हात धुणं चुकीचं समजले जातं. कारण आपल्याकडे भांडी लक्ष्मीचं प्रतिक मानली जातात. त्यामुळे खरकट्या हातांना जेवणाच्याच ताटात किंवा भांड्यात धुणं योग्य नाही. असे असूनही आपल्याकडील अनेक रेस्टॉरंट्समध्ये फिंगर बाउल देण्यात येतो.