अनेक रहस्य असलेल्या मोनालीसाच्या पेंटिंगची किंमत हजारो कोटी रूपये का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 04:03 PM2021-09-03T16:03:23+5:302021-09-03T16:03:53+5:30

अखेर या पेंटिंगमध्ये असं काय रहस्य आहे, ज्याचा शोध जगभरातील वैज्ञानिक घेत आहेत. आज मोना लीसाच्या पेंटिंगची किंमत ८६७ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार, जवळपास ६.४ कोटी रूपये आहे.

You should know Monalisa painting secrets and price | अनेक रहस्य असलेल्या मोनालीसाच्या पेंटिंगची किंमत हजारो कोटी रूपये का आहे?

अनेक रहस्य असलेल्या मोनालीसाच्या पेंटिंगची किंमत हजारो कोटी रूपये का आहे?

googlenewsNext

पेंटिंगचा विषय निघाला की, मोनालीसाच्या पेंटिंगचा उल्लेख झाला नाही असं होऊ शकत नाही. इटलीतील महान कलाकार Leonardo da Vinci ने ही पेंटिंग १५०३ मध्ये बनवली होती. जी आजही एक रहस्य बनून आहे. ही पेंटिंग जगातल्या प्रत्येक पेंटिंगपासून बनावट आणि किंमत दोन्हीबाबत वेगळी आणि अद्भूत आहे. अखेर या पेंटिंगमध्ये असं काय रहस्य आहे, ज्याचा शोध जगभरातील वैज्ञानिक घेत आहेत. आज मोनालीसाच्या पेंटिंगची किंमत ८६७ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार, जवळपास ६.४ हजार कोटी रूपये आहे.

Leonardo da Vinci यांनी पेंटिंगला १५१७ पर्यंत बनवणं जारी ठेवलं. कारण त्यांना मोनालीसाचे ओठ बनवण्यात अडचण येत होती. त्यामुळे केवळ ओठ बनवण्यात त्यांना १२ वर्षे लागली होती. त्यासोबतच या पेंटिंगचं सर्वात मोठं रहस्य तिची स्माइल आहे. ज्यावर अनेक वैज्ञानिक रिसर्च करत आहेत. या स्माइलचं रहस्य हे आहे की, ही पेंटिंगच्या अ‍ॅंगलने पाहाल ती वेगळी दिसते. म्हणजे जर एका अ‍ॅंगलने हसणारी दिसत असले तर दुसऱ्या अ‍ॅंगलने स्माइल हलकी होते. 

२००० साली हॉर्वर्डचे एक न्यूरोसाइंटिस्टने मोनालीसाच्या पेंटिंगवर अभ्यास केला होता. यानंतर त्यांनी सांगितलं की, पेंटिंगची स्माइल कधीच बदलत नाही. तर तुमचा मूड पेंटिंगला बघताना जसा असतो, पेंटिंगमध्ये स्माइल तशीच दिसते. जर तुम्ही आनंदी असाल तर पेंटिंग हसताना दिसेल आणि जर उदास असाल तर स्माइल हलकी दिसेल.

असं म्हटलं जातं की, ही स्माइल रहस्यमय असण्यामागचं रहस्य हे आहे की, ही पेंटिंग ज्या महिलेची आहे ती फार मोठं रहस्य लपवून होती. एका डॉक्टरांनी या रहस्याबाबत सांगितलं होतं की, मोनालीसाचे वरचे दोन दात तुटलेले असल्याने तिचा वरचा ओठ थोडा आतल्या बाजूने दबलेला आहे.

रहस्य तर भरपूर आहेत. जे लोकांसमोर आणण्यासाठी रिसर्च सुरूच असतात. पण मोना लीसा कोण होती? जिची ही पेंटिंग आहे ते आजही रहस्य बनून आहे. तेच एक थेअरी अशीही आहे की, मोना लीसा दुसरी कुणी नसून ते Leonardo स्वत: होते. त्यांनी स्वत:ला एका महिलेच्या रूपात बनवलं होतं.
 

Web Title: You should know Monalisa painting secrets and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.