कधीच पिऊ नका विमानात मिळणारी कॉफी, स्वत: अटेंडेंटने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 03:13 PM2023-12-05T15:13:27+5:302023-12-05T15:13:43+5:30
अमेरिकेतील एका फ्लाइटमध्ये कॅबिन क्रू म्हणून काम करणारी केविन नावाच्या महिलेने सोशल मीडियावर तिच्या नोकरीसंबंधी बरीच माहिती दिली.
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात. ते त्यानुसारच आपलं जीवन जगतात. आपल्यापैकी बरेच लोक कुठेना कुठे प्रवास करतात. कुणी रेल्वेने प्रवास करतात तर कुणी विमानाने. आजकाल विमानानेही बरेच लोक प्रवास करतात. एकदातरी या प्रवासाचा लोक अनुभव घेतात. कारण विमानाचं एक वेगळंच आकर्षण सगळ्यांना असतं.
रेल्वेत लोक आपल्यासोबत जेवणाचे डबे घेऊन जातात. पण पण फ्लाइटमध्ये ते असं करू शकत नाहीत. विमानाचा प्रवास छोटा असतो. अशात खाण्या-पिण्यापेक्षा लोक ड्रिंक्सवर जास्त फोकस करतात. ज्यूससोबतच विमानात चहा-कॉफी पण दिली जाते. लोक ती पितात. पण एका फ्लाइट अटेंडेंटने असं न करण्याचा सल्ला दिला आहे.
फ्लाइटमध्ये पिऊ नका कॉफी
अमेरिकेतील एका फ्लाइटमध्ये कॅबिन क्रू म्हणून काम करणारी केविन नावाच्या महिलेने सोशल मीडियावर तिच्या नोकरीसंबंधी बरीच माहिती दिली. टिकटॉकवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत तिने सांगितलं की, एविएशन इंडस्ट्रीचे आपले काही सीक्रेट आहेत. यावर कमेंट करत एका पायलटने सांगितलं की, फ्लाइटमध्ये कॉफी कधीच पिऊ नये. ती चांगली नसते. स्वत: केविनने मान्य केलं की, फ्लाइटमध्ये चहा-कॉफी पिणं बरोबर नाही. कारण ती फारच वाईट असते.
कारण...
यामागचं कारण सांगायचं तर याची दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे कॉफी बनवण्यासाठी ज्या टॅंकमधील पाणी घेतलं जातं, त्या टॅंकची स्वच्छता लवकर केली जात नाही. एअरप्लेन्समधील टॅंक स्वच्छ नसतात आणि त्या पाण्यापासून तयार केलेली कॉफी चांगली नसते. तेच दुसरं कारण म्हणजे भांडी धुण्यासाठी इथे टॉयलेटचा वापर केला जातो. सगळं पाणी तिथेच टाकलं जातं. अशात या भांड्यांवर बॅक्टेरिया आणि घाण पसरते. याच कारणाने प्लेनमधील कॉफी टाळावी. विमानात कॉफीचं सेवन तेव्हाच करा जेव्हा तिथे एस्प्रेसो मशीन असेल.