कमालच! जमिनीखाली नाही तर वेलावर लागतात हे बटाटे, नाव वाचूनही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:36 AM2024-01-11T11:36:39+5:302024-01-11T11:37:07+5:30
अनेक वर्षांपासून शेती करणारे हरसुखभाई यांनी अनोख्या पद्धतीने यशस्वी शेती करून सगळ्यांना थक्क केलं.
विकासाच्या मार्गावर चालत देशातील शेतकरीही आधुनिक होत आहेत. देशातील काही शेतकरी शेतीमध्ये असे असे प्रयोग करत आहेत जे चकीत करणारे असतात. सोबतच त्यांची कमाईही वाढत आहे. असाच एक कमाल जुनागढच्या केशोद तालुक्यात बघायला मिळाल. जो बघून लोक थक्क झाले. येथील एक शेतकरी हरसुखभाई डोबरीया यांनी जैन बटाट्याची शेती केली.
अनेक वर्षांपासून शेती करणारे हरसुखभाई यांनी अनोख्या पद्धतीने यशस्वी शेती करून सगळ्यांना थक्क केलं. त्यांनी या शेतीबाबत अनेकांना प्रशिक्षणही दिलं आहे. जेव्हा हरसुखभाई परिक्रमेदरम्यान 14 वयाचे असताना जुनागढमध्ये आले होते तेव्हा ते एका रस्त्याने हरवले होते. तेव्हा त्यांना एक संत भेटले. हरसुखभाई म्हणाले की, हे झाड त्या संतांनीच दिलं होतं.
टेस्ट गोड आहे
हरसुखभाई म्हणाले की, जैन बटाटे इतर बटाट्यांपेक्षा तुलनेने अधिक गोड असतात. या बटाट्याने हृदय चांगलं राहतं. आजही ते याच बटाट्यामुळे निरोगी आहेत. हरसुखभाई 75 वर्षातही हे बटाटे खात आहेत. हे बटाटेच त्यांच्या फीटनेसचं रहस्य आहेत.
जैन बटाटे असं नाव का?
जैन समाजातील लोक कंदमूळ असलेल्या भाज्या खात नाहीत. हे बटाटे जमिनीखाली उगवत नाहीतर जमिनीच्यावर वेलावर लागतात. त्यामुळे जैन लोकही हे बटाटे खाऊ शकतात. कदाचित यामुळेच या बटाट्यांना जैन बटाटे नाव पडलं असेल.