'तिच्या'साठी काय पण! भाच्याचं आत्यावरच प्रेम जडलं, 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 03:11 PM2021-08-25T15:11:46+5:302021-08-25T15:15:46+5:30
The young man fell in love with his aunt : भाच्याचं आपल्या आत्यावरच प्रेम जडलं आणि 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. बिहारच्या चंपारणमध्ये ही अजब घटना घडली आहे. भाच्याचं आपल्या आत्यावरच प्रेम जडलं आणि 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे. घराच्यांचा विरोध असल्याने पळून जाऊन त्यांनी शिव मंदिरात लग्न केलं आहे. ही घटना उघड झाल्यावर सर्वांनाच धक्का बसला असून नातेवाईक हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नात्याने आत्या असणाऱ्या मुलीसोबत मुलाचं प्रेम प्रकरण असल्याने कुटुंबीयांनी त्यांना क़डाडून विरोध केला होता.
आत्या आणि भाचा या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं, की वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली, जेणेकरुन ते लग्न करू शकतील. त्यानंतर कुटुंबाच्या विरोधात जाऊन ते दोघेही पळून गेले. दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. आत्या असणाऱ्या त्या नवरीचं वय 18 वर्ष असून भाच्याचं म्हणजेच नवरदेवाचं वय 19 वर्ष आहे. सहा वर्षांपूर्वी आदित्य पटेल आपल्या मामाकडे एका लग्नासाठी आला होता. त्यावेळी त्याचं नात्याने आत्या असणाऱ्या आंचल पटेलवर प्रेम जडलं. दोघांचं ही एकमेकांवर प्रेम होतं. अनेक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं.
प्रेमाने केला घात! भाजपाच्या युवा नेत्याने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं#Crime#Police#BJPhttps://t.co/vZxlH0mXYC
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2021
मुलगी नात्याने मुलाची आत्या लागत असल्याने मुलाच्या कुटुंबाचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. मुलीने कुटुंबीय तिला मारहाण करत असल्याचं सांगितलं. परंतु जसं मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण केली. त्यानंतर तीन दिवसांनी तिने घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न केलं. मुलगी घरात नसल्याने तिची शोधाशोध झाली. तिचे कुटुंबिय थेट मुलाच्या घरी पोहोचले. त्यावेळी या दोघांनी लग्न केल्याचं समजलं. शेवटी दोघांच्या हट्टापुढे कुटुंबीय देखील झुकले. या लग्नाची सर्वत्र सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी 'ती' चक्क पेटत्या निखाऱ्यांवरून चालली...#Crimehttps://t.co/f3FD8Zs3dc
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2021
खळबळजनक! आईच्या अफेअरबाबत समजताच मुलांनी टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं#Crime#Policehttps://t.co/66WgdenLY6
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021