आपल्याच होणाऱ्या नवरीला घेऊन पळाला तरूण, कारण वाचून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:41 AM2022-12-05T11:41:51+5:302022-12-05T11:42:26+5:30

Bihar : तरूण आणि तरूणी जेव्हा पळून गेले, घरातील लोकांना याची माहिती मिळाली तर त्यांना धक्का बसला. तरूणीच्या वडिलांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

Young man ran away with his bride to be in saran Bihar | आपल्याच होणाऱ्या नवरीला घेऊन पळाला तरूण, कारण वाचून सगळेच झाले हैराण

आपल्याच होणाऱ्या नवरीला घेऊन पळाला तरूण, कारण वाचून सगळेच झाले हैराण

Next

Bihar : बिहारच्या सारण जिल्ह्यातून लग्नाची एक अनोखी घटना समोर आली आहे. सध्या जिल्ह्यात याच घटनेची चर्चा रंगली आहे. सामान्यपणे एक तरूण आणि तरूणी पळून जाण्याचा निर्णय तेव्हाच घेतात जेव्हा त्यांना घरातून विरोध असतो. पण इथे एक तरूण त्याच्या होणाऱ्या पत्नीलाच घेऊन फरार झाला. जेव्हा याचं कारण समोर आलं तर सगळेच अवाक् झाले.

तरूण आणि तरूणी जेव्हा पळून गेले, घरातील लोकांना याची माहिती मिळाली तर त्यांना धक्का बसला. तरूणीच्या वडिलांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांनी मुलीला शोधून काढण्याची मागणी केली. पोलिसांनी दोघांना शोधूनही काढलं. जेव्हा त्यांना असं करण्याचं कारण विचारलं तर ते ऐकून पोलिसही हैराण झाले.

संध्या नावाच्या तरूणीचं लग्न बोलबम सहनीसोबत ठरतं होतं. लग्न ठरल्यानंतर दोघेही बरेच महिने फोनवर बोलत होते. दोघांच्या परिवारांनी ठरवलं की, दोघांचं लग्न पुढील वर्षी 2024 मध्ये होईल. इकडे लग्न होण्याआधीच तरूण आणि तरूणी घरा सोडून एकमेकांसोबत पळून गेले. तरूणीच्या वडिलांना पोलिसांकडे तरूणीला शोधण्याची मागणी केली. पोलिसांच्या दबावामुळे दोघेही 2 नोव्हेंबरला पोलीस स्टेशनला आले.

घरातील लोकांनी दोघांनाही पळून जाण्यामागचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की, लग्नाची तारीख पुढील वर्षी ठरवण्यात आली होती. पण त्यांना लवकर लग्न करायचं होतं. तर घरातील लोक उशीर करत होते. याच कारणाने दोघांनी पळून जाण्याच निर्णय घेतला. त्यानंतर घरातील लोकांनी जराही उशीर न करता एका मंदिरात दोघांचं लग्न लावून दिलं.

Web Title: Young man ran away with his bride to be in saran Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.