तरूणांनी खरेदी केलं जुनी ATM मशीन, उघडून पाहिली अन् नाचायलाच लागले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:50 IST2021-10-05T13:43:50+5:302021-10-05T13:50:32+5:30
व्हिडीओनुसार त्यांनी ही मशीन एका व्यक्तीकडून खरेदी केली होती. त्याने त्यांना याची चावीही दिली नव्हती. अशात तरूणांनी मोठ्या मेहनतीने ATM मशीन उघडली.

तरूणांनी खरेदी केलं जुनी ATM मशीन, उघडून पाहिली अन् नाचायलाच लागले....
काही तरूणांनी एक जुनी ATM मशीन खरेदी केली. पण त्यांना कुठे माहीत की, ही जुनी मशीन त्यांना लखपती बनवणार आहे. तरूणांना मशीनच्या मेटल बॉक्समध्ये २ हजार डॉलर म्हणजे दीड लाख रूपये सापडले. त्यांनी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय जो व्हायरल झालाय. व्हिडीओनुसार त्यांनी ही मशीन एका व्यक्तीकडून खरेदी केली होती. त्याने त्यांना याची चावीही दिली नव्हती. अशात तरूणांनी मोठ्या मेहनतीने ATM मशीन उघडली.
ladbible ने दिलेल्या वृत्तानुसार, तरूणांनी ३०० डॉलर म्हणजे २२ हजार ३६० रूपयांना ATM खरेदी केलं आणि यात काय आहे हे बघण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. ज्यात तरूण हतोडी, ड्रील आणि इतर टूल्सच्या मदतीने एटीएम उघडण्याचा प्रयत्न करतात. अशात त्यांना जे दिसतं ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो.
यातील एका तरूणाने सांगितलं की, तो एटीएम खरेदी करत राहतो आणि त्याने हे आम्हाला विकलं. त्याच्याकडे याची चावी नव्हती. अशात तो म्हणाला की, 'जर तुम्हाला हे खरेदी करायचं असेल, तर याच्या आत जे काही सापडेल ते तुमचं असेल. त्यामुळे आम्ही हे एटीएम खरेदी केलं. तसं काही लोकांचं नशीब कमाल असतं. २२ हजार खर्च करून त्यांनी लाखो रूपये कमावले.