प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी भाड्याने घेतलं हेलिकॉप्टर, आकाशात जाऊन मिळालं हे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 02:00 PM2021-11-02T14:00:53+5:302021-11-02T14:01:18+5:30
प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते. झाडाचं फळ तुटून खालीच का पडतं? अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला विज्ञानाच्या अभ्यासात मिळतं.
मुलांना जी गणितं आणि सायन्स शिकवलं जातं ते त्यांना भविष्यात पुढे जाण्यासाठी मार्गासारखं कामी येतं. न्यूटनच्या नियमांसारखे अनेक वैज्ञानिक तथ्य आहेत ज्यांचं महत्व मोठे झाल्यावर समजून येत. जागरूक मुले नेहमीच आपली जिज्ञासा शांत करण्यासाठी शिक्षकांना किंवा पालकांना प्रश्न विचारत राहतात. तर काही मोठे लोकही काही प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल करून बघतात. अशीच एक घटना समोर आली आहे. फिजिक्सचा एक नियम समजून घेण्यासाठी एका यूट्यबरने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं.
प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते. झाडाचं फळ तुटून खालीच का पडतं? अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला विज्ञानाच्या अभ्यासात मिळतं. अनेक प्रश्नांची उत्तरे शाळेची लॅब ते वैज्ञानिकांच्या लॅबमध्ये मिळतात. हे नियम कायदे मनुष्यांच्या जीवनाची निगडीत असतात. अशात वेरिटायसिम नावाचं एक यूट्यूब चालवणारा डेरेक मुलरने २०१४ मध्ये फिजिक्सच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी लाइव्ह प्रॅक्टिकल केलं.
२०१४ यूएस फिजिक्स ऑलम्पियाड टीमच्या क्लालीफाइंग परीक्षेत विचारण्यात आलेल्या ज्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी डेरेक आकाशात गेला होता, तो प्रश्न होता की, हेलिकॉप्टर खाली एक समान टेबल कसा लटकतो?
मुलरने या प्रश्नाचं उत्तर देत आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीलाच त्याने प्रेक्षकांसाठी प्रश्न वाचला. त्यावेळी हेलिकॉप्टर स्थित गतिवर उडत होतं आणि तो बघत होता की टेबल कसा लटकलेला आहे.