Video : Tata Punch मध्ये लावला घरातला विंडो एसी, पाहा पठ्ठ्यानं काय केला कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:23 AM2022-09-20T11:23:06+5:302022-09-20T11:24:53+5:30

पठ्ठ्यानं Bluestar कंपनीचा विंडो एसी विकत घेतला आणि आपल्या कारच्या बुटमध्ये तो फिटही केला. पाहा नक्की काय झालं…

youtuber YouTube FWS FunWithScience fit window ac in tata punch boot compare its performance with stock air conditioner watch video news | Video : Tata Punch मध्ये लावला घरातला विंडो एसी, पाहा पठ्ठ्यानं काय केला कारनामा

Video : Tata Punch मध्ये लावला घरातला विंडो एसी, पाहा पठ्ठ्यानं काय केला कारनामा

googlenewsNext

YouTube वर तुम्हाला एकापेक्षा एक असे कारनामे तुम्हाला पाहायला मिळाले असतील. युट्यूबवर अनेक एक्सपरिमेंटल चॅनल्स आहे, ज्याद्वारे युट्यूबर्स आपलं कौशल्य जगासमोर आणत असतात. अनेक जण काही ना काही हटके करण्याचाही प्रयत्न करत असतात. अशाच एका भारतीय युट्यूबरनं ब्युस्टार कंपनीचा विंडो एसी घेतला आणि तो आपल्या कारमध्ये फिट केला. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरंय. अधिक गरमीमुळे अनेकदा तुमच्या कारच्या एसीची परफॉर्मन्स खराब होते. अशातच तुम्हाला कारमध्ये एखादा पॉवरफुल विंडो एसी मिळाला तर… वास्तविक पाहता ही तुम्हाला मजा वाटेल. पण या पठ्ठ्यानं केलेला हा प्रयोग यशस्वी ठरलाय.

FWS - FunWithScience नावाचा युट्यूब चॅनल असेच काही ना काही प्रयोग करत असतो. या चॅनलवर जून महिन्यात ऑएक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यात युट्यूबरनं टाटा पंचच्या बुटस्पेसमध्ये एक विंडो एसी फिट केल्याचं दिसत आहे. तुम्हाला जाणून घएऊन आश्चर्यही वाटेल, तो विंडो एसी कामही करत आहे.

युट्यूबरनं एक ब्लूस्टार कंपनीचा विंडो एसी घेतला आणि त्यानं तो कारच्या बुटस्पेसमध्ये फिट केला. त्याला पॉवर देण्यासाठी त्यानं इनव्हर्टर आणि दोन मोठ्या बॅटरींचा वापरही केला. कारचा एसी आणि विंडो एसी यांची त्यानं तुलनाही केली आणि दोन्ही एसी आळीपाळीनं चालवून त्यानं तापनातील अंतरही पाहिलं. भलेही कोणाला आपल्या कारमध्ये अशाप्रकारे विंडो एसी फिट करणं आवडणार नाही. परंतु हा मजेशीर एक्सपरिमेंटल व्हिडीओ होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि हजारो नेटकऱ्यांनी याला लाईकही केलंय.

Web Title: youtuber YouTube FWS FunWithScience fit window ac in tata punch boot compare its performance with stock air conditioner watch video news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.