पाकिस्तानातील अजब घटना, अचानक समुद्रातून गायब झाला द्वीप!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:15 PM2019-07-15T16:15:01+5:302019-07-15T16:22:16+5:30

जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात, ज्या लोकांना आश्चर्याचा धक्का देतात. एक अशीच घटना पाकिस्तानमध्ये घडली.

Zalzala koh pakistan island disappears suddenly near the city of Gwadar | पाकिस्तानातील अजब घटना, अचानक समुद्रातून गायब झाला द्वीप!

पाकिस्तानातील अजब घटना, अचानक समुद्रातून गायब झाला द्वीप!

googlenewsNext

जगभरात अनेक विचित्र घटना घडत असतात, ज्या लोकांना आश्चर्याचा धक्का देतात. एक अशीच घटना पाकिस्तानमध्ये घडली. येतील ग्वादरच्या समुद्राजवळ असलेला एक द्वीप रातोरात अचानक गायब झाला. या घटनेमुळे अनेकजण प्रश्नात पडले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये आलेल्या भयावह भूकंपानंतर हा द्वीप पहिल्यांना समोर आला होता. पण सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा हा द्वीप रहस्यमयरित्या गायब झालाय.

(Image Credit : NASA)

अंड्याच्या आकाराचा हा द्वीप साधारण २९५ फूट लांब आणि १३० फूड रूंद होता. तर समुद्रापासून याची उंची साधारण ६० फूट होती. लोकांनी याचं नाव 'जलजला कोह' ठेवलं होतं. ज्याचा अर्थ भूकंपाचा पहाड असा होतो.

वैज्ञानिकांनुसार, भूकंपादरम्यान टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने या द्वीपाची निर्माण झालं होतं. जेव्हा लोकांनी समुद्रात पहिल्यांदा हा द्वीप पाहिला होता, तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडला होता की, हा द्वीप अचानक आला कुठून? नंतर लोक नावेच्या माध्यमातून द्वीपापर्यंत गेले तेव्हा त्यांना तिथे खूप चिखल, वाळू आणि दगड दिसले. सोबतच तिथे मिथेन गॅसही निघत होता.

(Image Credit : NASA)

नासाने काही फोटो जारी केले आहेत. ज्यात द्वीप कुठेच दिसत नाहीये. म्हणजे हा द्वीप अचानक गायब झाला आहे. पण पाकिस्तानात राहणाऱ्या काही लोकांचं म्हणणं आहे की, ६०-७० वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. ज्यात एक द्वीप तयार झाला होता आणि नंतर तो अचानक गायब झाला होता.

Web Title: Zalzala koh pakistan island disappears suddenly near the city of Gwadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.