काय म्हणावं याला?; Donkey अन् Zebra च्या प्रेमातून Zonkey जन्माला आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 12:22 PM2020-04-09T12:22:27+5:302020-04-09T12:24:43+5:30

Sheldrick Wildlife Trust च्या फेसबुक पेजवर या घटनेचा संपूर्ण किस्सा शेअर करण्यात आला आणि सोबत झेब्रा व Zonkey चे फोटोही शेअर केले आहेत.

Zebra had an affair with a donkey and gave birth to a zonkey api | काय म्हणावं याला?; Donkey अन् Zebra च्या प्रेमातून Zonkey जन्माला आला!

काय म्हणावं याला?; Donkey अन् Zebra च्या प्रेमातून Zonkey जन्माला आला!

Next

साधारपणे आपण बघतो की, कोणत्याही प्राण्याचं किंवा पक्ष्याचं पिल्लू किंवा बछडं हे त्यांच्यासारखं दिसणारंच असतं. म्हणजे वाघिणीला कुत्र्या पिल्लू झालं कधी होत नाही. पण अशी एक जरा वेगळी आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. Sheldrick Wildlife Trust यांना तेव्हा धक्का बसला जेव्हा त्यांनी पाहिलं की, एका मादा झेब्राने Zonkey ला जन्म दिला. म्हणजे हे Zonkey हा झेब्रा आणि Donkey म्हणजे गाढवाचं हायब्रीड आहे.

Sheldrick Wildlife Trust च्या फेसबुक पेजवर या घटनेचा संपूर्ण किस्सा शेअर करण्यात आला आणि सोबत झेब्रा व Zonkey चे फोटोही शेअर केले आहेत. त्यात त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका गावकऱ्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की, एक झेब्रा नॅशनल पार्क क्रॉस करून गावात शिरला. हा झेब्रा गावातील एका महिलेच्या अंगणात राहत होता. त्य महिलकडे आधीच काही गाढवं होती. काही आठवडे झेब्रा याच महिलेकडे राहिला. काही दिवसांनी मीडियात याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर झेब्राला पुन्हा नॅशनल पार्कमध्ये शिफ्ट करण्यात आलं.

दरम्यान झेब्राला लोकांच्या वस्तीची सवय झाली होती. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीचा विचार करून झेब्रासाठी ठिकाण निवडलं. Chyulu National Park मध्ये मादा झेब्रा शिफ्ट करण्यात आलं. अधिकारी या झेब्रावर सतत लक्ष ठेवून होते. दरम्यान काही महिन्यांनी त्यांना झेब्रासोबत एक लहान झेब्रााही दिसला. पण तो वेगळं होताा. तो झेब्रा वेगळं असण्याचं कारणही त्यांच्या लगेच लक्षात आलं. 

सामान्यपणे झेब्रावर पांढरे आणि ब्राउन पट्टे असतात, जे नंतर काळे होतात. पण या नवजात पिल्लावर पट्टे कमी आहेत आणि वेगळ्या रंगाचे आहेत. आधी त्यांना असं वाटलं होतं की, हे पिल्लू चिखलात खेळत असल्याने असं दिसत असेल. पण नंतर त्यांना खरं काय ते समजलं. त्यांना कळालं की, हे पिल्लू zonkey म्हणून जन्माला आलं.

zonkey हे झेब्रा आणि गाढवाचं फार दुर्मीळ हायब्रीड आहे. त्यामुळे लोकांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे आणि याने अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे.


 

Web Title: Zebra had an affair with a donkey and gave birth to a zonkey api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.