लेपाक्षी मंदिरातील झुलता खांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 02:31 AM2017-01-04T02:31:05+5:302017-01-04T02:31:05+5:30
आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात लेपाक्षी मंदिर आहे. या मंदिरातील झुलता खांब भाविक आणि पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. ‘हँगिंग पिलर टेम्पल’ म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते.
अनंतपूर : आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात लेपाक्षी मंदिर आहे. या मंदिरातील झुलता खांब भाविक आणि पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. ‘हँगिंग पिलर टेम्पल’ म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते. हे मंदिर एकूण ७० खांबांवर उभे आहे. यातील एक खांब अधांतरी आहे. जमिनीपासून काही अंतरावर असलेला हा खांब झुलता आहे. असे सांगितले जाते की, हा खांबही पूर्वी जमिनीला चिटकून होता. पण, एका ब्रिटीश इंजिनिअरने हे खांब कसे टिकून आहेत? हे पाहण्यासाठी हा खांब हलविला तेंव्हापासून तो असाच झुलत आहे. महादेव, विष्णु आणि वीरभद्राचे मंदिर म्हणूनही ही जागा ओळखली जाते. या मंदिराच्या निर्मितीबाबत इतिहासात डोकावले तर असे दिसते की, वीरुपण्णा आणि वीरण्णा या भावंडांनी या १५८३ मध्ये या मंदिराची उभारणी केली आहे.
- रावण जेव्हा सीतेचे हरण करुन या भागातून जात होता,
तेव्हा जटायू पक्षाने रावणाशी याच जागी युद्ध केल्याचेही सांगितले जाते. श्रीराम जेंव्हा घटनास्थळी आले, तेव्हा जटायूची स्थिती पाहून त्यांच्या तोंडून शब्द गेले ‘ली पक्षी’. त्यातूनच या मंदिराचे नाव लेपाक्षी झाल्याची वदंता आहे. लेपाक्षी मंदिरापासून जवळच दगडापासून बनलेली २७ फूट लांंब आणि १५ फूट उंच नंदीची भव्य मूर्ती आहे.