Asian Games 2018: महिला कबड्डीमध्येही सुवर्ण हुकले; रौप्यपदकावरच समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:49 PM2018-08-24T13:49:47+5:302018-08-24T14:22:28+5:30
Womens Kabbadi at Asian Games 2018: महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने भारताला 27-24 या फरकांनी पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले.
जकार्ता : कबड्डीमध्ये भारताला पुरुषांपोठापाठ महिला संघालाही सुवर्णपदक पटकावता आले नाही. गुरुवारी भाराताच्या पुरुष संघाला इराणने उपांत्य फेरीत पराभूत केले होते. महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने भारताला 27-24 या फरकांनी पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
#TeamIndia at the #AsianGames2018
— Team India (@ioaindia) August 24, 2018
Iranian Women's Kabaddi team showed that they are made of nerves of steel, to topple the undefeated #AsianGames champions of Kabaddi. Indian Women's Kabaddi team suffers a shocker loss at the hands of Iran, to settle for Silver.#IAmTeamIndiapic.twitter.com/7HOgCRlkLQ
पहिल्या सत्रात भारताच्या संघाने दमदार कामगिरी करत 13-11 अशी आघाडी मिळवली होती. पहिले सत्र संपण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी असताना भारताकडे 13-8 अशी आघाडी होती. पण त्यानंतर इराणने चढाईमध्ये दोन आणि पकडीमध्ये एक गुण मिळवला आणि पिछाडी तीन गुणांनी भरून काढली.
इराणने दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटात तीन गुणांची कमाई करत 14-13 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर इराणने भारताच्या संघाला सर्वबाद केले आणि 17-13 अशी दमदार आघाडी मिळवली. त्यानंतर बाराव्या मिनिटापर्यंत इराणने 24-20 अशी आघाडी कायम ठेवली होती. त्यानंतर इराणने आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.