छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई उपनगरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:24 PM2018-12-21T20:24:44+5:302018-12-21T20:25:25+5:30

सामन्याच्या अखेरची काही मिनिट शिल्लक असताना सोनालीच्या पकडीने सामना पुण्याच्या बाजूने झुकला

Chhatrapati Shivaji Maharaj Trophy Kabaddi: Mumbai Suburban in quarter-finals | छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई उपनगरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुण्याचा बचाव भेदत बोनस करताना सातारा संघाची खेळाडू.

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे आज दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात मुंबई उपनगर विरुद्ध नाशिक सामन्याने सुरुवात झाली. मुंबई उपनगर विरुद्ध नाशिक मध्ये झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर संघाने ४३-२२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.

पुणे संघाला ठाणे ने चांगली टक्कर देत पुणेला मध्यंतरा पर्यत जास्त आघाडी मिळवून दिली नाही. मध्यंतराला पुणे कडे १८-१६ आघाडी होती. पुणे कडून चढाईत आम्रपली गलांडे ने आक्रमक चढाई करून पुणेची आघाडी वाढवली. हर्षदा सोनवणे पकडीत जबरदस्त खेळ दाखवला. ठाणे कडून माधुरी गावंडी व अर्चना करडे याना चांगला खेळ केला परंतु त्या आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.

पुरुष विभागात रायगड विरुद्ध नंदुरबार यांच्यात झालेल्या लढतीत रायगड संघाने ३९-१९ असा विजय मिळवत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. मुंबई उपनगर संघाने अकोलाचा ५३-१७ असा सहज पराभव केला. पुणे विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत रत्नागिरी कडे मध्यंतर पर्यत २ गुणाची आघाडी होती. पुणेने रत्नागिरी ला चांगली टक्कर देत ३६-३६ असा बरोबरीत संपला. कोल्हापूर ने अहमदनगर चा ५६-२२ असा धुव्वा उडवला.

महिला विभातात पुणे विरुद्ध सातारा सामनाने सुरुवात झाली. मध्यंतरा पर्यत सातारा कडे २९-२६ अशी आघाडी होती. सोनाली हेलवीच्या आक्रमक चढाईनी बलाढ्य पुणे संघाला चांगलीच दमछाक झाली. मध्यंतरानंतर आम्रपली गलांडे चांगला खेळ करत सातारला अधिक आघाडी मिळवून दिली नाही. सामन्याच्या अखेरची काही मिनिट शिल्लक असताना सोनालीच्या पकडीने सामना पुणे कडे फीरला, पुणे संघाने ५९-५४ असा विजय मिळवला. पुणे कडून रुतीका हुमनेने चांगल खेळ केला. सातारच्या सोनाली हेलवीने केलेली एकतर्फी झुंज वर्थ ठरली. पण या सामन्यात सोनाली हेलवीने एकटीने तब्बल चढाईत ३६ गुण मिळवत एक नवीन विक्रम केला.

मुंबई उपनगर विरुद्ध रायगड या महिलांच्या सामन्यात उपनगरने ३६-२१ अस विजय मिळवला. उपनगर कडून चढाईत सायली नागवेकर व कोमल देवकर ने चांगला खेळ केला. तेजस्वी पाटेकर व राणी उपहारने पकडीत चांगला खेळ केला. रायगड कडून मोनाली घोंगे व समीक्षा पाटील यांनी चांगला खेळ केला पण त्याना अपयश आले.

पुरुष विभातात रायगड विरुद्ध बीड सामना रायगड ने ४६-१८ असा सहज जिंकला. रायगड कडून चढाईत सुलतान डांगे व बिपीन थले यांनी चांगला खेळ केला. मयूर कदम ने चांगल्या पकडी केल्या. ठाणे विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात ठाणेने ३९-३३ असा जिंकला. ठाणे कडून प्रशांत जाधव व असलम इनामदार यांनी चांगला खेळ केला.

आतापर्यंत झालेल्या सामन्याचे संक्षिप्त निकाल:

पुरुष विभाग:

१) रायगड ४६ विरुद्ध बीड १८

२) सांगली ४६ विरुद्ध अहमदनगर २७ (काल झालेला)

३) रत्नागिरी ३३ विरुद्ध ठाणे ३९

४) मुंबई शहर ४७ विरुद्ध नाशिक २९

५) नंदुरबार ५४ विरुद्ध अमरावती २०

६) कोल्हापूर ३४ विरुद्ध नागपूर १५

७) पुणे ३९ विरुद्ध भंडारा १४

 

महिला विभाग:

१) पुणेव५९ विरुद्ध सातारा ५४

२) मुंबई उनगर ३६ विरुद्ध रायगड २१

३) रत्नागिरी ४८ विरुद्ध अहमदनगर १६

४) पालघर ५१ विरुद्ध सिंधुदुर्ग ०८

५) ठाणे ४५ विरुद्ध अमरावती १७

६) नाशिक २८ विरुद्ध नागपूर २४

७) मुंबई शहर ५२ विरुद्ध अकोला ०७

८) कोल्हापूर ३६ विरुद्ध बुलढाणा १०

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Trophy Kabaddi: Mumbai Suburban in quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी