ऊर्जा संतुलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:01 AM2018-05-22T00:01:22+5:302018-05-22T00:01:22+5:30
जेव्हा आपण निसर्गाने बनविलेल्या भौतिक नियमांकडे पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचे संतुलन आहे.
डॉ. भूषण कुमार उपाध्याय
ऊर्जा या सृष्टीचे मूळ आहे. या ऊर्जेमुळेच सृष्टीतील सर्व क्रिया संचलित होतात. कार्य संचलनासाठी, एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये लागली पाहिजे. जर ऊर्जेची मात्रा कमी असेल किंवा मात्रा पूर्ण झाल्यानंतरही जर एखाद्या विशिष्ट पद्धतीने त्या ऊर्जेचा वापर झाला नाही, तर कार्य संपादन होऊ शकत नाही.
जेव्हा आपण निसर्गाने बनविलेल्या भौतिक नियमांकडे पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचे संतुलन आहे. ज्यावेळी ऊर्जेचे संतुलन बिघडते, त्यावेळी उलट-सुलट घडण्यास सुरुवात होते. जसे वायुमंडलामध्ये पंचमहाभूतांचे जे गुणोत्तर आहे, ते एका विशिष्ट ऊर्जा-संतुलनासोबतच पूर्ण होत असते. अनेक नैसर्गिक संकटे ही निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे येतात.
मानवी शरीर ही या निसर्गाची सर्वात उत्तम रचना आहे. या मानवी शरीरात निसर्गाचे सर्व नियम नियमित काम करतात. ऊर्जा संतुलनाचा सिद्धांत या मानवी शरीरालाही पूर्णत: लागू होतो. यामुळेच चिकित्सा-शास्त्रानुसार शरीरात ज्या क्रि या संचलित होतात व जे तत्त्व दिसून येतात, ते तत्त्व एका विशिष्ट गुणोत्तरात दिसून येतात. म्हणूनच शारीरिक व जैविक ऊर्जा एका विशिष्ट संतुलनाने मानवी शरीरात काम करीत असते. जसे- रक्तदाबाचे संतुलन १२०-८० व रक्तातील साखर १००-१४० असली पाहीजे. जेव्हा हे संतुलन बिघडते, तेव्हा आजार होतात. चिकित्सा-शास्त्रज्ञांच्या मते- शरीराचा प्रत्येक अणू व परमाणू या संतुलनासोबतच काम करतो. शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीसाठी ऊर्जेचे हे संतुलन आवश्यक आहे.
मानवी- शरीराचे ऊर्जा संतुलन राखण्यासाठी विचार, वाणी व कर्माचे खूप मोठे योगदान आहे. तज्ज्ञांच्या मते- विकासातील सर्वात मोठी ऊर्जा आपल्या विचारात सामावलेली आहे. विचार हे वाणी व कर्माचे जनक आहे. म्हणूनच सकारात्मक विचार ऊर्जेचे संतुलन दृढ करते, तर नकारात्मक विचार त्या ऊर्जेचे संतुलन बिघडवते. अशाप्रकारे वाणीसुद्धा आपल्या ऊर्जेच्या संतुलनाला बऱ्याचअंशी प्रभावित करीत असते. शुद्ध व चांगली वाणी ऊर्जा संतुलनाला मजबूत करते. अशाप्रकारे आपले सत्कर्म, जीवन व शरीराचे ऊर्जा-संतुलन राखून ठेवते. म्हणूनच शारीरिक व मानिसक आरोग्यासाठी चांगले विचार, शुद्ध वाणी व सत्कर्म आवश्यक आहे.