प्रो-कबड्डी : बंगालचा दुसरा विजय; यूपीवर ४०-२० ने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:47 AM2017-08-07T01:47:48+5:302017-08-07T01:47:48+5:30

उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविणाºया कोरियाचा जांग कुन ली याच्या चपळ चढाईच्या बळावर बंगाल वॉरियर्सने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात रविवारी यूपी योद्धा संघाची विजयी घोडदौड रोखताना २० गुणांनी आकर्षक दुसऱ्या विजयाची नोंद केली.

Pro-Kabaddi: Bengal's second win; 40-20 over the UEFA |  प्रो-कबड्डी : बंगालचा दुसरा विजय; यूपीवर ४०-२० ने मात

 प्रो-कबड्डी : बंगालचा दुसरा विजय; यूपीवर ४०-२० ने मात

googlenewsNext

किशोर बागडे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविणाºया कोरियाचा जांग कुन ली याच्या चपळ चढाईच्या बळावर बंगाल वॉरियर्सने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात रविवारी यूपी योद्धा संघाची विजयी घोडदौड रोखताना २० गुणांनी आकर्षक दुसऱ्या विजयाची नोंद केली.
तेलुगू टायटन्सला हैदराबाद येथे ३० विरुद्ध २४ अशा फरकाने नमविल्यानंतर बंगालने नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलात ‘दम’ दाखविला. यूपी योद्धावर आज ४० विरुद्ध २० अशा विजयाची नोंद केली. या सामन्याआधी ‘ब’ गटात सलग दोन सामने जिंकून ताकद दाखविणाऱ्या यूपी योद्धाला बंगालविरुद्ध सूर न गवसल्याने त्यांच्या विजयाची हॅट्ट्रिक हुकली. आठ गुण घेणारा विनोद कुमार हा सामन्याचा मानकरी ठरला. मनिंदरसिंग याने विजयात सात
गुणांची भर घातली. पराभूत यूपी योद्धाकडून सुरिंदरसिंगने सर्वाधिक पाच तर राजेश नरवाल याने केवळ तीन गुणांची कमाई केली.
बंगाल संघाने सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखले. पहिल्या सात मिनिटांतरच यूपीवर एक लोन बसवून त्यांनी ११-२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. कर्णधार सुजित, विनोद कुमार आणि कोरियाचा खेळाडू जांग कुन ली यांंचे प्रत्येकी दोन गुणांचे योगदान राहिले. त्यानंतर बंगालच्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी खेळाडूंची कोंडी करीत अलगद पकडी करताच गुणांचा आलेख वाढत जाऊन मध्यांतरापर्यंत आघाडी २२-८ अशी झाली. बंगालने चढाईतून २२ तसेच पकडीतून ९ गुण मिळविले. प्रतिस्पर्धी यूपीला तीनदा ‘आॅल आऊट’ केल्याबद्दल सहा गुणांची अतिरिक्त कमाई झाल्याने बंगालच्या खेळाडूंचे मनोबळ उंचावले. काल बंगळुरू बुल्सवर विजय मिळविणारा यूपी अयोध्या संघ फॉर्ममध्ये दिसलाच नाही. कर्णधार नितीन तोमर आणि राजेश नरवाल यांना चढाईत पूर्णपणे अपयश आल्याने संघासाठी दोघेही प्रत्येकी एक गुण मिळवू शकले. सुरिंदरसिंग याने सर्वाधिक तीन गुण मिळविल्याने त्यांना आठ गुणांपर्यंत मजल गाठता आली. मध्यंतरानंतरही काही अपवाद वगळता बंगालचेच वर्चस्व राहिले. अखेरची दहा मिनिटे शिल्लक असताना बंगालचे ३४ तर यूपीचे १२ असे गुण होते. नंतरही यूपी संघ सावरू शकला नाही. यूपी संघाला चढाईतून १३ आणि पकडीतून केवळ चारच गुण मिळाल्यामुळे पराभव पत्करावा लागला.

पटणा पायरेट्सचा बंगळुरू बुल्सवर एकतर्फी विजय
पाचव्या पर्वात सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकणाºया गतविजेता पटणा पायरेट्सने बंगळुरू बुल्सला त्यांच्या होमग्राऊंडवर ४६-३२ ने नमवून सलग तिसºया विजयाची नोंद केली. बंगळुरुचा चार सामन्यात हा दुसरा आणि सलग तिसरा पराभव ठरला.
कर्णधार प्रदीप नरवालच्या सर्वाधिक १५ गुणांच्या बळावर सध्याचा विजेता पटणा पायरेट्सने खेळणाºया बंगळुरु बुल्सविरुद्ध मध्यांतरापर्यंत २३-११ अशी भक्कम आघाडी संपादन केली. विनोद कुमारने पाच गुणांची भर घातली. मोनू गोयत आणि विनोद कुमार यांनी प्रत्येकी सात आणि विशाल माने याने चार गुणांची भर घातली. विशाल माने सामन्याचा मानकरी ठरला.

Web Title: Pro-Kabaddi: Bengal's second win; 40-20 over the UEFA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.