प्रो कबड्डी : हरियाणाने हिसकावला गुजरातचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:26 AM2017-08-03T01:26:58+5:302017-08-03T01:27:04+5:30
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत झुंजार खेळ करताना हरियाणा स्टीलर्स संघाने गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाला २७-२७ असे बरोबरीत रोखले.
हैदराबाद : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत झुंजार खेळ करताना हरियाणा स्टीलर्स संघाने गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाला २७-२७ असे बरोबरीत रोखले. संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजविल्यानंतरही गुजरातला बरोबरीवर समाधान मानावे लागले.
गुजरातने आक्रमक सुरुवात करीत हरियाणावर बºयापैकी दडपण आणले; परंतु हरियाणाने बचावावर अधिक भर देताना हळूहळू पुनरागमन केले. मध्यंतराला गुजरातने ११-८ अशी आघाडी राखली होती. पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला हरियाणावर लोणचे संकट होते; परंतु त्यांचा अखेरचा खेळाडू प्रशांत कुमार राय याने २ गुण मिळवताना संघावरील संकट टाळले. गुजरातने २८व्या मिनिटाला हरियाणावर लोण चढवून २०-१३ अशी ७ गुणांची मोठी आघाडी घेतली. परंतु, यानंतर हरियाणाने चपळ खेळ करून सामन्याचे चित्र पालटण्यास सुरुवात केली. ३४व्या मिनिटाला विकास खंडोलाने सुपर रेड करीत हरियाणाची पिछाडी २०-२३ अशी कमी केली. पुढच्याच मिनिटाला गुजरातवर लोण चढवून हरियाणाने २४-२३ अशा आघाडीसह अखेरपर्यंत नियंत्रण राखत गुजरातला बरोबरीत रोखले. विकास खंडोला व सुरेंदर नाडा यांनी अनुक्रमे आक्रमण व बचावात प्रत्येकी ७ गुण घेऊन हरियाणाचा पराभव टाळण्यात मोलाचे योगदान दिले. गुजरातकडून सुकेश हेगडे, सुनील कुमार, परवेश बैनस्वाल व सचिन चांगले खेळले. (वृत्तसंस्था)
तेलगूच्या पराभवाची हॅट्ट्रिक...
पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या तेलगू टायटन्सला कामगिरी उंचावण्यात आलेल्या अपयशामुळे यंदाच्या सत्रात सलग तिसºया पराभवाला सामोरे जावे लागले. मनिंदरसिंगचा तुफानी अष्टपैलू खेळ आणि कोरियन स्टार जँग कुन ली याच्या आक्रमक चढाया या जोरावर बंगाल वॉरियर्सने विजयी सुरुवात करताना बलाढ्य तेलगूला ३०-२४ असा धक्का दिला.