Pro Kabaddi League 2018: अजय ठाकूरची विक्रमी चढाई, आणखी एक शिखर सर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 15:41 IST2018-10-11T15:40:35+5:302018-10-11T15:41:00+5:30
Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाजचा कर्णधार अजय ठाकूरने विक्रमी चढाई करताना आणखी एक शिखर सर केले.

Pro Kabaddi League 2018: अजय ठाकूरची विक्रमी चढाई, आणखी एक शिखर सर
चेन्नई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाच्या चौथ्या दिवशी तमिळ थलायव्हाज आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात तमिळ थलायव्हाजचा कर्णधार अजय ठाकूरने विक्रमी चढाई करताना आणखी एक शिखर सर केले. त्याला विक्रमाचे हे शिखर सर करण्यासाठी 17 गुणांची आवश्यकता होती. बेंगळुरू बुल्सविरुद्ध त्याने 20 गुणांची कमाई केली आणि आणखी एक विक्रम नावावर केला.
अजयने सहाव्या पर्वात गुणांचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने चार सामन्यांत चढाईत 53, तर एकूण 54 गुणांची कमाई केली आहे. बेंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 19 गुण कमावताच त्याने एक वेगळा विक्रम नावावर केला. प्रो कबड्डीच्या इतिहासात 600 गुणांची कमाई करणारा तो तिसरा खेळाडू ठरला. या सामन्यापूर्वी त्याच्या खात्यात 583 गुण होते. आता त्याच्या खात्यात एकूण 603 गुण झाले आहेत. या विक्रमात तेलुगु टायटन्सचा राहुल चौधरी ( 719) आणि पाटणा पायरेट्सचा प्रदीप नरवाल ( 643) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
सर्वाधिक गुणांची कमाई करणारे पाच खेळाडू
1) राहुल चौधरी – 80 सामने , 719 गुण
2) प्रदीप नरवाल – 65 सामने, 643 गुण
3) अजय ठाकूर – 84 सामने, 603 गुण
4) दीपक हुडा – 82 सामने, 579 गुण
5) अनुप कुमार – 79 सामने, 550 गुण