Pro Kabaddi League 2018 : गतविजेत्या पाटणा पायरेट्सचा दारुण पराभव; तमिळ थलायव्हाजची सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 09:18 PM2018-10-07T21:18:48+5:302018-10-07T21:25:11+5:30
तमिळ थलायव्हाजचा ४२-२6 असा दणदणीत विजय
चेन्नई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरूवात झाली. या पर्वात प्रत्येक संघात बरेच बदल झाले असल्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली. पण, गतविजेत्या पाटणा पायरेट्सला सलामीलाच पराभव पत्करावा लागला. तमिळ थलायव्हाजने ४२-२6 असा दणदणीत विजय मिळवला.
पाटणाला पहिल्याच सामन्यात थलायव्हाजने चांगलेच झुंजवले. पहिल्या सत्रात एक लोण चढवताना थलायव्हाजने २६-८ अशी भक्कम आघाडी घेतली. पहिल्या सत्रात अजय ठाकूर (७) आणि सुरजीत सिंग (६) यांचा दबदबा जाणवला.
.@tamilthalaivas are feeling at home, leading 26-8 in the first half against @PatnaPirates! Can the defending champions change things around? Stay tuned! #CHEvPAT
— ProKabaddi (@ProKabaddi) October 7, 2018
मध्यंतरानंतही थलायव्हाजने लोण चढवत सुरुवातीलाच गतविजेत्यांना कोंडीत पकडले. त्यांनी ३२-८ अशी आघाडीत भर घातली. पाटणाच्या प्रदीप नरवालने एकाकी झुंज दिली. अजय ठाकूरने पुन्हा एकदा सुपर १० गुणांची कमाई केली.
Expectation: Ajay Thakur scores a Super 10! 😍
— ProKabaddi (@ProKabaddi) October 7, 2018
Reality: Ajay Thakur scores a Super 10! 😍#VivoProKabaddiBegins#CHEvPAT
पाटणाने त्यानंतर सामन्यात पुनरागमनाचे केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले. थलायव्हाजने हा सामना ४२-२६ असा सहज जिंकला. अजय ठाकूरने सर्वाधिक 14 गुण कमावले. दुसऱ्या सत्रात पाटणाला थलायव्हाजवर एक लोण चढवण्यात यश आले.