Pro Kabaddi League 2018: अखेरच्या सेकंदापर्यंत रंगला दिल्ली आणि गुजरात सामन्याचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 08:56 PM2018-10-09T20:56:03+5:302018-10-09T21:11:06+5:30
दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन करत दबंग दिल्ली संघाने गुजरात फॉर्च्यूनजायंट्सबरोबरचा सामना बरोबरीत सोडवला.
चेन्नई : दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन करत दबंग दिल्ली संघाने प्रो-कबड्डी लीगमधील गुजरात फॉर्च्यूनजायंट्सबरोबरचा सामना बरोबरीत सोडवला. पहिल्या सत्रात गुजरातने १७-१२ अशी पाच गुणांची आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात दिल्लीने दमदार खेळ केला आणि सामना ३२-३२ असा बरोबरीत सोडवला.
.@Fortunegiants led proceedings in the beginning, but it was some rear-guard action from @DabangDelhiKC that saw them clinching a draw from the jaws of defeat! #DELvGUJ#VivoProKabaddipic.twitter.com/55LKAAZayb
— ProKabaddi (@ProKabaddi) October 9, 2018
दिल्लीच्या संघाने दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन केले. सामना अखेरच्या पाच मिनिटांमध्ये त्यांनी गुजरातचा सर्व संघ बाद केला. त्यानंतर चार मिनिटे शिल्लक असताना २९-२९ अशी बरोबरी केली. त्यानंतर सामना संपायला एक मिनिट असताना दिल्लीने पुन्हा एकदा ३१-३१ अशी बरोबरी केली.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये पाच गुणांचा फरक होता. पहिल्या सत्रात गुजरातने दिल्लीवर १७-१२ अशी आघाडी मिळवली होती. पहिल्या सत्रात गुजरातने दिल्लीवर एक लोण चढवला होता.
Last year’s finalists have grabbed the upper hand as they go into half-time, with a 12-17 lead! Can @DabangDelhiKC find a way back? Watch the 2nd half LIVE on Star Sports. #DELvGUJ#VivoProKabaddi
— ProKabaddi (@ProKabaddi) October 9, 2018
सामन्याच्या सुरुवातीपासून गुजरातच्या संघाने दिल्लीवर वरचष्मा ठेवला होता. मध्यंतरापर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवली होती.
The experience of Shabeer Bappu or the youthful aggression of Sachin – what’ll shine in tonight’s #VivoProKabaddi encounter? 🧐 #DELvGUJpic.twitter.com/O9z6bzFfI2
— ProKabaddi (@ProKabaddi) October 9, 2018