Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीचे मुंबई व पुण्यातील सामने कधी, ते घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 05:29 PM2018-10-07T17:29:59+5:302018-10-07T17:31:29+5:30
Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. या लीगने अल्पावधीतच क्रीडा प्रेमींना आपलेसे केले आहे. त्यामुळे सहाव्या पर्वाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मुंबई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. या लीगने अल्पावधीतच क्रीडा प्रेमींना आपलेसे केले आहे. त्यामुळे सहाव्या पर्वाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात प्रत्येक संघात बरेच बदल झाले असल्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायव्हाज यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. त्यानंतर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्र डर्बीचा सामना होईल.
India ka apna sport - bachpan ka khel hai, bacchon ka nahin! 💪🏻#VivoProKabaddi's fittest and bravest heroes are stepping onto the mat - watch it LIVE on Star Sports. pic.twitter.com/JSBEA1aHPQ
— ProKabaddi (@ProKabaddi) September 16, 2018
चेन्नई आणि सोनीपत या टप्प्यानंतर प्रो कबड्डीचे सामने पुण्यात होतील. 18 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत आंतरविभागीय सामने पुण्यात होणार आहे. मुंबईचा टप्पा हा 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. याशिवाय पाटणा, नोएडा, अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता व कोची या शहरांमध्ये प्रो कबड्डीचे सामनो होतील. स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईत 5 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
पुणे आणि मुंबईच्या टप्प्यातील सामने कधी व कोणते ?
पुणे : 18 ते 25 ऑक्टोबर
18 ऑक्टोबरः पुणेरी पलटन वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स
19 ऑक्टोबरः पाटणा पायरेट्स वि. तेलुगु टायटन्स; पुणेरी पलटन वि. जयपूर पिंक पँथर्स
20 ऑक्टोबरः युपी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स; पुणेरी पलटन वि. यू मुंबा
21 ऑक्टोबरः दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरियर्स; पुणेरी पलटन वि. बेंगळुरु बुल्स
22 ऑक्टोबरः विश्रांती
23 ऑक्टोबरः यू मुंबा वि. तेलुगु टायटन्स; पुणेरी पलटन वि. तामिळ थलायवाज
24 ऑक्टोबरः बेंगळुरु बुल्स वि. हरयाणा स्टीलर्स; पुणेरी पलटन वि. युपी योद्घा
25 ऑक्टोबरः विश्रांती
मुंबईः 9 ते 15 नोव्हेंबर
9 नोव्हेंबरः यू मुंबा वि. जयपूर पिंक पँथर्स; बंगाल वॉरियर्स वि. तेलुगु टायटन्स
10 नोव्हेंबरः पाटणा पायरेट्स वि. बंगाल वॉरियर्स; यू मुंबा वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स
11 नोव्हेंबरः यू मुंबा वि. हरयाणा स्टिलर्स
12 नोव्हेंबरः विश्रांती
13 नोव्हेंबरः पुणेरी पलटन वि. तेलुगु टायटन्स; यू मुंबा वि. युपी योद्धा
14 नोव्हेंबरः तामिळ थलायवाज वि. हरयाणा स्टीलर्स; यू मुंबा वि. बेंगळुरू बुल्स
15 नोव्हेंबरः पाटणा पायरेट्स वि. दबंग दिल्ली; यू मुंबा वि. तामिळ थलायवाज
संपूर्ण वेळापत्रकासाठी लिंकवर क्लिक करा...
https://www.prokabaddi.com/schedule-fixtures-results