प्रो-कबड्डी: पाटणा पायरेट्सची विजयी हॅटट्रीक, फायनलमध्ये गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 09:41 PM2017-10-28T21:41:47+5:302017-10-28T22:12:18+5:30

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे.

Pro-Kabaddi: Patna Pirates won the hat-trick, defeating Gujarat FortuneJoints in the final. | प्रो-कबड्डी: पाटणा पायरेट्सची विजयी हॅटट्रीक, फायनलमध्ये गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा पराभव

प्रो-कबड्डी: पाटणा पायरेट्सची विजयी हॅटट्रीक, फायनलमध्ये गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा पराभव

googlenewsNext
ठळक मुद्दे- प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे.पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा  ५५-३८ ने पराभव केला.

चेन्नई- प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा  ५५-३८ ने पराभव केला.  पाटण्याने प्रो-कबड्डीत विजेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली आहे. चेन्नईत आज रंगलेल्या या सामन्याचा पाटण्याचा खेळाडू प्रदीप नरवाल विजयाचा हिरो ठरला. प्रदीपने सामन्यात चढाईत १९ गुणांची कमाई केली. त्याला मोनू गोयतने चढाईत ९ तर विजयने बचावफळीत ७ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. 

फायनल मॅचच्या पहिल्या सत्रात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने आक्रमक सुरूवात केली होती. गुजरातने आक्रमक चढाई करत पाटणा टीमला धक्का दिला. सचिन तवंर आणि राकेश नरवाले पाटण्याच्या डिफेन्सला धक्का देत पाचव्या मिनीटाला पाटणा पायरेट्सला ऑलआऊट केलं. ऑलआऊट झाल्याने सुरूवातीला काहीसा बॅकफूटवर गेलेल्या पाटना पायरेट्सने सामन्यात कमबॅक केलं. पाटण्याचा कॅप्टन प्रदीप नरवार आणि मोनू गोयत यांनी जोरदार सुरूवात केली. प्रदीप आणि मोनू गोयतने पहिल्याच सत्रात अखेरीस १८-२१ अशी ३ गुणांची आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात गुजरातने पाटणाला टक्कर दिली. .गुजरातने दुसऱ्या सत्रात महेंद्र राजपूतला मैदानात उतरवलं. महेंद्रने चढाईत चांगले गुण मिळवत आपल्या संघाची पिछाडी काही गुणांनी कमी केली. पण प्रदीप नरवालच्या आक्रमक खेळापुढे गुजरातच्या डिफेन्स टीमचा निभाव लागला नाही. दुसऱ्या सत्रात अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. पाटणाच्या आक्रमक खेळीमुळे काहीप्रमाणात दबावाखाली गेलेल्या गुजरात टीमच्या डिफेन्सने मॅचमध्ये चुका करत पाटण्याला गुण मिळवून दिले.  या जोरावर पाटणा पायरेट्सने गुजरातला सामना संपायला ९ मिनीटं बाकी असताना दोन वेळा ऑलआऊट करत ३८-२६ अशी आघाडी घेतली.

यानंतरही गुजरातकडून महेंद्र राजपूत आणि चंद्रन रणजीथ यांनी काही गुणांची कमाई करत पाटणा पायरेट्सवर ऑलआऊटचं केलं. मात्र सामन्यात फक्त एक खेळाडू शिल्लक राहिलेला असताना प्रदीप नरवालने गुजरातच्या २ खेळाडूंना बाद करत आपल्या संघावरचं ऑलआऊटचं संकट केलं. यानंतर पाटण्याच्या ३ खेळाडूंनी सुपर टॅकल करत पाटण्याच्या आघाडीत वाढ केली. यानंतर प्रत्येक वेळा गुजरातचे सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने हाणून पाडला.

Web Title: Pro-Kabaddi: Patna Pirates won the hat-trick, defeating Gujarat FortuneJoints in the final.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.