'कल्याण'मस्तू... महिना १० हजार कमावणाऱ्यास इन्कम टॅक्सची १ कोटी १४ लाख रुपयांची नोटिस
By मुरलीधर भवार | Published: February 2, 2023 10:04 PM2023-02-02T22:04:13+5:302023-02-02T22:04:53+5:30
वरक यांना त्यांच्या कंपनीकडून महिन्याला जेमतेम १० हजार रुपये पगार मिळतो. त्याचे वर्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये आहे.
कल्याण-कल्याणमधील ठाणकर पाडा येथे राहणारे चंद्रकांत वरक यांना इनकम टॅक्स विभागाकडून एक कोटी १४ लाख रुपयांची नोटिस पाठविण्यात आली. ही नोटीस पाहून वरक हे चक्रावून गेले आहेत. वरक हे ठाणकर पाडय़ातील दुर्गानगर येथे राहतात. ते ठाण्यातील एका कुरिअर कंपनीत हाऊस किपिंगचे काम करतात. ते आणि त्यांची बहिण हे दोघेच कुटंबातील सदस्य आहे.
वरक यांना त्यांच्या कंपनीकडून महिन्याला जेमतेम १० हजार रुपये पगार मिळतो. त्याचे वर्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये आहे. ते नेहमीप्रमाणे घरातून ठाण्याला कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना इमकम टॅक्सची नोटिस त्यांच्या हाती पडली. ही नोटिस चक्क एक कोटी १४ लाख रुपये रक्कमेची होती. या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले होते की त्यांच्या पॅनकार्डवरुन १ कोटी १४ लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे. त्यांच्या हाती पडलेली नोटिस त्यांनी अनेक वेळा वाचून काढली. मात्र त्यातील नमूद रक्कमेच्या ट्रान्झॅक्शनचा आकडा पाहून ते हवालदिल झाले. त्यांची स्थिती एकदम चक्रावून गेली. त्यांनी ही नोटिस मिळताच इनकम टॅक्स कार्यालयात धाव घेतली. तेव्हा त्याठिकाणच्या अधिकारी वर्गानेही त्यांना नोटिसमध्ये नमूद असलेला आशय विशद करीत पॅन कार्डवरुन १ कोटी १४ लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे. त्यामुळे वरक यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र, वरक यांनी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.
दरम्यान, वरक यांच्या पॅन कार्डचा गैरवापर कोणी केला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरीत आहे. पॅन कार्डच्या आधारे ट्रान्झॅक्शन झालेली रक्कम ही थोडी थोडकी नसून १ कोटी १४ लाख रुपये असल्याने ते चक्रावून गेले आहेत.