ट्रेनमध्ये प्रवाशाकडे सापडले १ कोटी ७३ लाखांची रोकड आणि दागिने, आयकर विभागाकडून तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 01:38 PM2022-10-03T13:38:45+5:302022-10-03T13:39:21+5:30
आयकर विभागाकडे रोकड आणि दागिने व्यापाऱ्याला सूपूर्द केले आहे.
मुरलीधर भवार
कल्याण-ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्यायाकडून टिटवाळा आरपीएफ जवानांनी एक कोटी १७ लाखाची रोकड आणि ५८ लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत. जी. पी. मंडल असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याच्याकडे सापडलेल्या रक्कमेची कागदपत्रे नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफने आयकर विभागाकडे रोकड आणि दागिने व्यापाऱ्याला सूपूर्द केले आहे.
१ ऑक्टोबर रोजी लखनऊहून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकात हळू झाली. याचा फायदा घेत टिटवाळा एक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरला. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. या व्यक्तिची हाचलाची संशयास्पद होत्या. हे पाहून आरपीएफ जवानी एल. बी. बाग आणि शुभम खरे यांनी त्याला हटकले.
त्याला टिटवाळा आरपीएफ कार्यालयात घेऊन गेले. या बाबत आरपीएफचे सिनिअर इन्स्पेक्टर अंजली बाबर यांनी या व्यक्तिची कसून चौकशी केली. जी माहिती समोर आली ते ऐकून अधिकारी हैराण झाले. जी. पी. मंडल असे या व्यक्तिचे नाव असून तो नवी मुंबईतील कळंबोळी येथे राहतो. त्याचे मुंबईतील झवेरी बाजारात दुकान आहे. त्याच्याकडून आरपीएफ जवानांनी एक कोटी १७ लाखाची रोकड आणि ५६ लाखाचे दागिने हस्तगत केले आहे. रोकड आणि दागिन्याची कागदपत्रे त्याच्याकडे नाही. आरपीएफने याची माहिती आयकर विभागाला दिली. सध्या या प्रकरणाचा तपास आयकर विभाग करीत आहे.