Coronavirus: ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी १ कोटीचा निधी; मुलाच्या लग्नाच्या खर्चात लोकांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 04:25 PM2021-04-25T16:25:45+5:302021-04-25T16:26:34+5:30
महापालिका क्षेत्रत १७०० रुग्ण आढळून येत आहे. उपचारासाठी रुग्णांच्या नातवाईकांची धावपळू सुरुच आहे.
कल्याण-ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने कोविड रुग्णालये सुरु करता येत नाही. कोविड रुग्णालये सुरु व्हावीत यासाठी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहिर केले आहे. इतकेच नाही आमदारांच्या मुलाचे लग्न आहे. हा लग्न सोगळा साधेपणाने करणार असून लग्नासाठी होणारा खर्च नागरीकांच्या लसीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.
महापालिका क्षेत्रत १७०० रुग्ण आढळून येत आहे. उपचारासाठी रुग्णांच्या नातवाईकांची धावपळू सुरुच आहे. एकीकडे इंजेक्शनचा तुटवडा तर दुसरीकडे ऑक्सीजन बेडची कमतरता. नागरीक त्रस्त आहे. प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहे. कल्याण डोंबिवलीत काही ठिकाणी कोविड रुग्णालये तयार होऊन सज्ज आहेत. त्यापैकी कल्याण पूर्व भागातील विठ्ठलवाडी येथे १०० बेडचे रुग्णालय सज्ज आहे. काही दिवसात हे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा करण्यात आली. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने नव्याने कोविड रुग्णालय सुरु करा नका अशी ताकीद प्रशासनाला सरकारने दिली आहे. त्यामुळे नवे कोविड रुग्णालय सुरु होत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता कल्याण पूव्रेचे आमदार गणपत गायकवाड यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहिर केले आहे. इतकेच नाही तर गणपत गायकवाड यांच्या मुलाचे ४ मे रोजी लग्न आहे. या लग्नासाठी काही महिन्यापासून गायकवाड कुटुंबियांनी तयारी सुरु केली होती. कोविड वाढल्याने हे लग्न अत्यंत साधेपणा केले जाणार आहे. या लग्नासाठी जो खर्च येणार होतो. ते सगळे पैसे आत्ता मतदार संघातील नागरीकांच्या लसीकरणासाठी खर्च केले जाणार अशी माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे.