उल्हासनगरमध्ये जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी

By अनिकेत घमंडी | Published: March 31, 2023 05:00 PM2023-03-31T17:00:48+5:302023-03-31T17:14:56+5:30

महिला अधिकाऱ्यांच्या अधिनस्त पथकाने ही कामगिरी केली असून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट जप्त करण्यात पथकाला यश आले.

1 lakh 91 thousand power theft from jeans pressing factory in dombivali | उल्हासनगरमध्ये जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी

उल्हासनगरमध्ये जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी

googlenewsNext

डोंबिवली: उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापित विशेष पथकाने उल्हासनगरच्या गायकवाडपाड्यातील जीन्स प्रेसिंग कारखान्याची १ लाख ९१ हजारांची वीजचोरी उघडकीस आणली. महिला अधिकाऱ्यांच्या अधिनस्त पथकाने ही कामगिरी केली असून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट जप्त करण्यात पथकाला यश आले. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी पथकप्रमुख उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांचा सन्मान करुन पथकाच्या कामगिरीचे कौतूक केले. कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन यावेळी उपस्थित होते.

संजू धनश्याम ललवाणी (बराक क्रमांक १९१७ समोर, सेक्टर ४०, गायकवाडपाडा, उल्हासनगर) असे या प्रकरणातील जीन्स प्रेसिंग कारखाना चालकाचे नाव आहे. कल्याण मंडल दोन अंतर्गत उपकार्यकारी अभियंता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २९ मार्चला या कारखान्याच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. यात रिमोटच्या साह्याने नियंत्रित जॅमर बसवून मीटरमधील वीजवापराची नोंद बंद अथवा सुरू करण्याची यंत्रणा बसवल्याचे आढळून आले. या यंत्रणेच्या माध्यमातून कारखाना चालकाने १ लाख ९१ हजार २४० रुपये किमंतीची १३ हजार २६६ युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीजचोरीचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. वीजचोरीच्या देयकाशिवाय १ लाख ३० हजार रुपयांची तडजोडीची रक्कमही संबंधिताला भरावी लागणार आहे. अन्यथा वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्य अभियंता औंढेकर व अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता चौधरी व सहायक अभियंता नेहा ढोणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जनमित्र रमेश शिंदे, सुरेश गायकवाड तसेच प्रशिक्षणार्थी प्रथम जाधव यांनी कारवाईत सहकार्य केले. या पथकाने मार्च महिन्यात १२ ठिकाणी सुरू असलेल्या १ लाख ५० हजार युनिटच्या वीजचोऱ्या पकडल्या आहेत.
 

Web Title: 1 lakh 91 thousand power theft from jeans pressing factory in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.