डोंबिवली MIDC निवासी परिसरातील रस्ते कॉन्क्रीटीकरणामुळे ११० झाडांवर कुऱ्हाड?
By मुरलीधर भवार | Published: January 11, 2023 06:15 PM2023-01-11T18:15:49+5:302023-01-11T18:16:40+5:30
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्ते ...
डोंबिवली - डोंबिवलीएमआयडीसी निवासी भागात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्ते विकास कामात ११० झाडांवर कु:हाड चालवावी लागणार आहे. ही झाडे बाधित होणार असल्याने त्यांचे पुनरेपन करणार याविषयीची निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.
डोंबिवली निवासी भागात ब:यापैकी वनराई आहे. तसेच या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्याने वाटसरुंना थंडगार सावली मिळते. त्याचबरोबर या ठिकाणचे वातावरणात खुली हवा अनुभवण्यास मिळते. निवासी भागात प्रदूषणाचा त्रस असल्याने ही वनराई प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी कामी येते. या भागात रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. रस्ते विकासाचे काम एम. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने दिलेल्या प्रस्तावानुसार जवळपास ११० झाडे या रस्ते विकास कामात बाधित होत असल्याने ही झाडे तोडण्याची अनुमती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे मागितली आहे. या ठिकाणच्या नागरीकांनी रस्ते विकासाला आमचा विरोध नाही. मात्र झाडे न तोडता ती वाचविता आल्यास ते पाहावे. तसेच झाडे तोडण्या ऐवजी त्याचे पुनरेपन करावे अशी मागणी केली आहे. या मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यास नागरीकांचा झाडे तोडण्यास विरोध राहिल असे इशारा या ठिकाणच्या नागरीकांकडून देण्यात आला आहे.
यासंदर्भात वृक्ष प्राधिकरणाचे प्रमुख संजय जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित कंत्रटदाराने एमएमआरडीएच्या माध्यमातून २४ आणि ४ झाडे अशी २८ झाडे तोडण्याची परवानगी स्वतंत्र दोन अर्जाद्वारे केली आहे. त्यावर अद्याप प्राधिकरणाकडून काही एक विचार विनिमय झालेला नाही. या अर्जाची छाननी केली जाईल. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली जाईल. झाडे वाचविण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून केला जाणार आहे. गरज असल्यास ती तोडली जातील अन्यथा त्याचे पुनरेपन करण्याचाही विचार केला जाईल. तूर्तास तरी एकही झाड तोडण्याची परवानगी दिलेली नाही.
कोणत्या प्रकारची देशी झाडे आहेत
वड, पिंपळ, उंबर, करंज, मुचकुंद, बकूळ, सप्तपर्णी, पळस, बुचाचे झाड, सोनसाफा, शिसंम, बदाम, कदंब, आंबा, अशोक, चिंच, मेंदी यांचा समावेश आहे तर विदेशी झाडांमध्ये गुलमोहर, सोनमोहर, पिचकारी, कैलासपती आदींचा समावेशआहे.