रोकड आणि मोबाईल घेऊन १२ वर्षीय चिमुकल्याने सोडले घर पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:08 PM2021-08-13T20:08:22+5:302021-08-13T20:09:05+5:30
अलीकडे अल्पवयीन मुल घरातुन पळून जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.अशीच एक घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली
अलीकडे अल्पवयीन मुल घरातुन पळून जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.अशीच एक घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आला आहे. घरातून मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन एक 12 वर्षीय मुलगा घरातून पळून गेला. लोकलने प्रवास करत असताना हा मुलगा सुदैवाने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी या मुलाच्या पालकांचा शोध घेतला आणि चिमुकल्याला पालकांच्या स्वाधीन केले. आपल्या मुलाला सुखरूप पाहून पालकांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने 12 वर्षीय मुलगा इतर वाम मार्गाला लागण्यापासून बचावला.
शुक्रवारी डोंबिवलीकडे लोकलने येत असताना मध्य बाजूकडील प्रथम वर्ग डब्यात एक अनोळखी लहान मुलगा विनापालकांसह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता हा मुलगा घरातून निघून आला होता. त्याच्याकडे साधारण 10 हजार किंमतीचा एक मोबाईल आणि 19 हजार 300 रुपयांची रोकडही सापडली. पोलिसांनी प्रभारी पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्यासमोर हजर करून पुन्हा चौकशी केली.या मुलाने त्याचे नाव सांगितल्यानंतर आणि दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पालकांचा शोध घेतला. त्यानंतर या मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र इतकी मोठी रक्कम लहान मुलांच्या हाताला लागतेच कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे.