१२ वीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका; सामाजिक कार्यकर्ते, दक्ष नागरिक सरसावले
By अनिकेत घमंडी | Published: February 21, 2024 11:23 AM2024-02-21T11:23:51+5:302024-02-21T11:30:12+5:30
मानपाडा रस्त्यावर ही घटना घडली, एकही वाहतूक पोलीस तेथे नव्हता
डोंबिवली - बारावीच्या परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली, पण पहिल्याच दिवशी रस्ते कामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला, ते वाहतूक कोंडीत अडकले आणि एकच तणाव निर्माण झाला.
मानपाडा रस्त्यावर ही घटना घडली, एकही वाहतूक पोलीस तेथे नव्हता. त्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि वातावरण तंग झाले. मानपाडा रस्त्यावर स्टार कॉलनी पासून पुढे डी।मार्ट पर्यंत कामे सुरू आहेत, त्यामुळे वाहनाचा वेग मंदावतो, त्याचा परिणाम कोंडीत होत आहे. त्याचा फटका स्कुल बस, प्रवासी बस वाहतूकने येणारे नागरिक आदींना दैनंदिन बसतो, त्याचे गांभीर्य प्रशासनाला नाही. त्यामुळे नागरिक हैराण आहेत, त्याचाच त्रास आज 12 वीच्या विद्यार्थ्यांना झाला
सामाजिक कार्यकर्ते, दक्ष नागरिक एक वॉर्डन आदींनी ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. एका मुलीला त्यामुळे रडू कोसळले, ती घाबरली, परीक्षेला जाता येईल की नाही या तणावात ती होती असे प्रत्यक्ष दर्शी नागरिकाने सांगितले. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.