कल्याण : सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी १४ कोटींच्या निधीला केंद्र सरकार अनुकूल

By अनिकेत घमंडी | Published: March 17, 2023 01:03 PM2023-03-17T13:03:43+5:302023-03-17T13:03:56+5:30

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून अनुराग ठाकूरांची भेट  

14 Crore Fund for Sports Complex at Subhash Maidan approved by Central Govt kalyan kapil patil | कल्याण : सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी १४ कोटींच्या निधीला केंद्र सरकार अनुकूल

कल्याण : सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी १४ कोटींच्या निधीला केंद्र सरकार अनुकूल

googlenewsNext

कल्याण : खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत कल्याण शहरातील सुभाष मैदानात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपये मंजूर करावेत, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्याकडे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन ठाकुर यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर सुभाष मैदानातील भव्य क्रीडा संकुलाचे पहिले पाऊल पडले असल्याचे मानले जात  असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया पाटील यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली.

कल्याण पश्चिममधील ऐतिहासिक सुभाष मैदानाला विविध खेळांची परंपरा आहे. या मैदानातील मातीतून अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत सुभाष मैदानात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी ) पाटील प्रयत्नशील आहेत. या भव्य संकुलासाठी २४ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी पाटील यांनी खासदार निधी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे.

केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या निधीमधून नियोजित भव्य क्रीडा संकुलात ४०२०१२.५० मीटरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलसाठी प्रशस्त हॉल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ८३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हॉकीसाठी प्रकाशयोजना असलेले नैसर्गिक मैदान २ कोटी ६३ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. खासदार निधी व कल्याण महापालिकेच्या माध्यमातून अद्ययावत जॉगिंग ट्रॅक, संरक्षक भिंत, पार्किंग आणि इतर क्रीडा सुविधा उभारल्या जाणार आहेत.

क्रीडा संकुल कल्याणचा अभिमान : कपिल पाटील
सुभाष मैदानाच्या मातीतून अनेक दिग्गज खेळाडू घडलेले आहे. कल्याणची क्रीडा संस्कृती व सुभाष मैदान असे अनोखे नाते आहे. ते कायम ठेवण्यासाठी २४ कोटी ५० लाख रुपये खर्चून भव्य क्रीडा संकूल उभारले जात आहे. ते कल्याणवासियांच्या अभिमानाचे संकुल ठरेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली

Web Title: 14 Crore Fund for Sports Complex at Subhash Maidan approved by Central Govt kalyan kapil patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.