डोंबिवलीतील स्वराज दहिहंडी उत्सावात गोविंदा पथकाकरीता १५ लाखांची बक्षिसे
By नितीन पंडित | Published: September 4, 2023 04:55 PM2023-09-04T16:55:08+5:302023-09-04T16:58:01+5:30
हंडी फोडणाऱ्या डोंबिवलीतील गोविंद पथकाला १ लााख ५१ रुपये, मुंबतील गोविंद पथकाला १ लाख रुपये आणि महिला गोविंद पथकाला ५१ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे.
डोंबिवली - दीपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने यंदाही स्वराज दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सावात १५ लाखाची बक्षिसे गोविंदा पथकाना वापट केली जाणार आहे. त्याचबरोबर गतिमंदानाही दहिहंडीचा आनंद घेता यावा यासाठी दहिहंचा प्रातिनिधीक थर क्षतिज गतिमंद शाळेचे विद्यार्थी उभारणार असल्याची माहिती आयोजक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
मागच्या वर्षीय फाऊंडेशनच्या वतीने दहिहंडी उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी कर्णबधीर शाळेच्या विद्यार्थ्याना दहिहंडी उत्सावातील प्रवाहात आणण्याच प्रयत्न केला गेला होता. यंदा डोंबिवलीतील क्षितीज गतीमंद विद्यार्थ्यांच्या शाळेतील विद्यार्थी दहिहंडीचा आनंद लूटणार आहे. आज फाऊंडेशनच्या वतीेन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस क्षितीज शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुरेखा गायकवाड आणि शिक्षिका अक्षदा दरेकर या उपस्थित होत्या. या उत्सावात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहे.
क्षितीज शाळेतील विद्यार्थ्यांच्या निमित्ताने गतीमंद विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या गरजा याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष या दहिहंडी उत्सावाच्या निमित्ताने वेधले जाणार आहे. या उत्सावात केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील आणि कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर ख्यातनाम लोक गायक आनंद शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम दहिहंडी उत्सावात गोविंदा पथकांसह मान्यवरांचे मनोरंजन करीत गोविंदा पथकाचा उत्साह वाढविणार आहे.
हंडी फोडणाऱ्या डोंबिवलीतील गोविंद पथकाला १ लााख ५१ रुपये, मुंबतील गोविंद पथकाला १ लाख रुपये आणि महिला गोविंद पथकाला ५१ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे. ज्या गोविंदा पथकाकडून विविध थरांची सलामी देण्यात येईल. त्यांना देखील थर लावण्याचे बक्षिस दिले जाणार आहे. एकूण १५ लाख रुपयांची बक्षिसे वाटप केली जाणार आहेत. गोविंद पथकाच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. तसेच गोविंद पथकाकरीता फिरता दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय अग्नीशमन दलासह अत्यावश्यक सेवा पुरविण्याची काळजी घेण्यात आली आहे.