ठाकुर्लीत १५ वाहनांना बंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार

By अनिकेत घमंडी | Published: October 21, 2023 03:46 PM2023-10-21T15:46:01+5:302023-10-21T15:46:16+5:30

रस्ता अरुंद असल्याने वाहतूक सुरू ठेवून काम करणे शक्य नाही, त्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.

15 vehicles banned in Thakurli | ठाकुर्लीत १५ वाहनांना बंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार

ठाकुर्लीत १५ वाहनांना बंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार

डोंबिवली: महानगरपालिकेच्या जुने हनुमान मंदिर चोळेगाव ठाकुर्ली ते बँक ऑफ महाराष्ट्र अथवा कै. रामभाऊ चौधरी चौक ठाकुर्ली दरम्यानचे रस्त्यावर दि. २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यन्त १५ दिवस पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात येणार आहे.  रस्ता अरुंद असल्याने वाहतूक सुरू ठेवून काम करणे शक्य नाही, त्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.

त्या रस्त्यावर व परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये अगर सदर ठिकाणी काही अपघात होऊ नये या कारणास्तव म्हसोबा चौक ९० फिट रोड येथून ठाकुर्ली पूर्व स्टेशन कडे येणारी वाहतूक जुने हनुमान मंदिर चोळेगाव ठाकुर्ली पूर्व येथे तसेच डोंबिवली कडून व्ही.पी. रोड मार्गे ठाकुर्ली पूर्व येथे येणारी वाहतूक बँक ऑफ महाराष्ट्र अथवा कै. रामभाऊ चौधरी चौक ठाकुर्ली पूर्व येथे ' प्रवेश बंदकरण्यात येणार आहे. या मार्गाचा वापर करणार्या नागरिकांनी सुचनेचे पालन करावे अशी अपेक्षा वाहतूक उपविभाग डोंबिवली करण्यात आली.

प्रवेश बंद म्हसोबा चौक ९० फिट रोड कडून ठाकुर्ली पूर्व स्टेशन कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जुने हनुमान मंदिर चोळेगाव ठाकुर्ली पूर्व येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

 पर्यायी मार्ग : सदरची वाहने ठाकुर्ली चोळेगाव हनुमान मंदिर कडून कै. फोशीबाई भोईर चौक अथवा बंदिश पॅलेस हॉटेल मार्ग इच्छित स्थळी जातील . 

प्रवेश बंद : व्ही पी रोड मार्गे ठाकुर्ली पूर्व कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बँक ऑफ महाराष्ट्र अथवा कै. रामभाऊ चौधरी चौक ठाकुर्ली पूर्व येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

 पर्यायी मार्ग: सदरची वाहने बँक ऑफ महाराष्ट्र अथवा कै. रामभाऊ चौधरी चौक ठाकुर्ली पूर्व येथून वळण घेवुन व्हीं पी रोड मार्गे मंजुनाथ शाळा घरडा सर्कल मार्गे आपल्या इच्छित स्थळी जातील. सदरची वाहतूक अधिसूचना ही पोलीस वाहने फायर ब्रिगेड रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.

Web Title: 15 vehicles banned in Thakurli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.