दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

By प्रशांत माने | Published: September 21, 2023 05:24 PM2023-09-21T17:24:24+5:302023-09-21T17:25:22+5:30

दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे १८ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले

18 metric tonnes of Nirmalya collected during the half-day Ganapati immersion | दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

googlenewsNext

 

कल्याण: कल्याण डोंबिवलीतील विविध विसर्जनस्थळावर बुधवारी रात्री उशीरापर्यंत १५ हजार ६५५ श्री गणेश मुर्तींच्या झालेल्या विसर्जनात तीन हजार ७१२ शाडुच्या आणि ११ हजार ९४३ पीओपीच्या श्रीगणेश मुर्तींचा समावेश होता. प्रदुषणमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना राबविली जात आहे. त्याला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. दिड दिवसांच्या श्री गणेशाच्या विसर्जनावेळी सुमारे ३२ टक्के पर्यावरण पूरक गणेश मुर्तींचे विसर्जन झाल्याची माहीती मनपाने दिली.

दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे १८ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. याबाबत श्री गणेशोत्सव मंडळांनी देखील महापालिकेस सहकार्य करुन उत्तम प्रतिसाद दिला. महापालिकेमार्फत प्रथमच गणेशोत्सव मंडळांकडून निर्माल्य संकलन करण्यासाठी कल्याण मध्ये दोन डंपर व डोंबिवली मध्ये दोन डंपर्सचे (निर्माल्य रथ) नियोजन केले होते. त्यामार्फत एकूण दोन मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. याकामी विविध संस्थाचे अनमोल सहकार्य महापालिकेस लाभले. संकलित केलेले निर्माल्य कल्याण येथील ऊंबर्डे मधील बायोगॅस प्रकल्पात नेवून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. तर डोंबिवलीतील निर्माल्य हे श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांच्या खत निर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. निर्माल्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट आता लावली जात असल्याने नदी, खाडी यामध्ये हे निर्माल्य जावून संबंधित जलस्त्रोत प्रदुषित होण्याचे प्रमाण कमी झाल्याकडेही मनपाने लक्ष वेधले आहे.

Web Title: 18 metric tonnes of Nirmalya collected during the half-day Ganapati immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.