लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८२४ प्रकरणे निकाली, २ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा

By अनिकेत घमंडी | Published: September 11, 2023 05:02 PM2023-09-11T17:02:18+5:302023-09-11T17:02:48+5:30

महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत केला भरणा

1824 cases of electricity consumers settled by Lok Adalat, payment of Rs 2 crore 61 lakh | लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८२४ प्रकरणे निकाली, २ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा

लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८२४ प्रकरणे निकाली, २ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा

googlenewsNext

अनिकेत घमंडी, डोंबिवली: तालुकास्तरावर शनिवारी  आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी १८२४ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी २ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा केला.

कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार १८२४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व २ कोटी ६१ रुपयांचा भरणा झाला. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात २०२ ग्राहकांनी ३४ लाख ६९ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातील १ कोटी ७६ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या ९७२ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील ३६१ ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत ३४ लाख ३१ हजार रुपयांचा भरणा केला. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील २८९ ग्राहकांनी १६ लाख ३ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली.

लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, उपविधी अधिकारी दीपक जाधव, सहायक विधी अधिकारी सुहास बाराहाते, शिल्पा हन्नावार यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 1824 cases of electricity consumers settled by Lok Adalat, payment of Rs 2 crore 61 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.