डोंबिवलीत आजपासून १९ व्या आगरी महोत्सवाला सुरुवात, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

By मुरलीधर भवार | Published: December 13, 2023 07:54 PM2023-12-13T19:54:39+5:302023-12-13T19:55:10+5:30

बड्या वक्तांचा यात सहभाग आहे. त्यामुळे साहित्य, संस्कृतीची मेजवाणी डोंबिवलीसह पंचक्रोशीतील नागरीकांना अनुभवता येणार आहे.

19th Agari Mahotsav begins today in Dombivli, inaugurated by former MP Ramsheth Thakur | डोंबिवलीत आजपासून १९ व्या आगरी महोत्सवाला सुरुवात, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

डोंबिवलीत आजपासून १९ व्या आगरी महोत्सवाला सुरुवात, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

 

डोंबिवली-आगरी यूथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आज सायंकाळी सात वाजता करण्यात आले.

या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, समाजाचे नेते दशरथ पाटील, आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते. डोंबिवली संत सावळाराम क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेला आगरी महोत्सव २० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात आगरी कला संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. आगरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा आगरी महाेत्सव हा समाजातील सर्व घटकाना एकत्रित एका व्यासपीठावर आणतो अशी प्रतिक्रिया माजी खासदार ठाकूर यानी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली आहे. या महोत्सवात मराठी भाषा संवर्धन आणि जतन, आगरी कवी संमेलन,सन्मान आगरी स्त्री शक्तीचा, स्वराज्याच्या उभारणीत आगरी समाजाचे योगदान आदी साहित्य सांकृतिक कार्यक्रम होणार आहे.

बड्या वक्तांचा यात सहभाग आहे. त्यामुळे साहित्य, संस्कृतीची मेजवाणी डोंबिवलीसह पंचक्रोशीतील नागरीकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय आगरी मसाला, खाद्य पदार्थ, पापड, मिरगुंडे, आगरी पद्थतीचे जेवण, पुस्तक प्रदर्शन, खादीचे कपडे, फर्निचर, गाड्या, सुक्या मासळीचा बाजार, मुलांसाठी खेळण्यांचा झोन असलेला आनंद बाजार आदी सगळ्यांचा आनंद २० डिसेंबरपर्यंत घेता येणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या महोत्सवास भेट देऊन साहित्, संस्कृती, प्रबोधन, मनोरंजनासह सगळयांचा आनंद लूटावा.
 

Web Title: 19th Agari Mahotsav begins today in Dombivli, inaugurated by former MP Ramsheth Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.